काॅंग्रेसची अवस्था `डबल ढोलकी`सारखी : विखे पाटील

राहुल गांधीचे विधान हे दुटप्‍पी आहे. सरकारमध्‍ये राहायचे आणि आम्‍हाला निर्णयाचे आधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे. मग सरकारमध्‍ये तुम्‍ही थांबलातच कशाला, तात्‍काळ सरकारमधुन बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा.
radhakrushna vikhe 2
radhakrushna vikhe 2

लोणी : सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची आवस्‍था ‘डबल ढोलकी सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील, तर सत्‍तेत राहाता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्‍या विधानावर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना विखे पाटील म्‍हणाले, की राहुल गांधीचे विधान हे दुटप्‍पी आहे. सरकारमध्‍ये राहायचे आणि आम्‍हाला निर्णयाचे आधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे. मग सरकारमध्‍ये तुम्‍ही थांबलातच कशाला, तात्‍काळ सरकारमधुन बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. एकीकडे सत्‍तेत राहायचे, सत्‍तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्‍हणुन जबाबदारी झटकायची, असे दोन्‍ही बाजुने बोलायचे, असे कसे चालेल? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

राज्‍यात एवढे मोठे संकट उभे आहे, मुंबईची अवस्‍था अतिशय बिकट झाली आहे. देशातील ४० टक्‍के जनता ही एकट्या मुंबईत आहे. या महानगरात निर्माण झालेल्‍या परिस्थितीला सत्‍तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्‍यातील प्रत्‍येक घटक या संकटामुळे अडचणीत आला असतानासुध्‍दा राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्‍यमंत्र्यांच्‍या काही व्‍यक्‍तीगत अडचणी असतील, त्‍यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत, परंतु बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत, याचे कोडे राज्‍यातील जनतेला उलगडलेले नाही.

राज्‍यात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्‍याचे आपण पाहत आहोत. भावाअभावी शेती मालाची परवड झाली आहे. खरीप हंगाम समोर आला असताना नियोजन नाही, फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर बैठकांचा फार्स सुरु आहे. पालमंत्रीसुध्‍दा औपचारिकता म्‍हणुन जिल्‍ह्यात येवून फक्‍त आढावा घेतात. ठोस निर्णय होत नसल्‍याने जनतेला या सरकारकडुन कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्‍यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्‍त लोकांची दिशाभूल करणारे असून, या निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना राष्‍ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसही जबाबदार असल्‍याचा आरोप आमदार विखे पाटील यांनी केला.

केंद्र सराकारने महाराष्‍ट्राला विविध माध्‍यमांतून २८ हजार कोटी रुपयांची मदत देवू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्‍या या मदतीवर टीका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला तुम्‍ही काय दिले, याची श्‍वेतपत्रिका काढा, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com