काॅंग्रेसतर्फे उद्या उद्योगांसाठी `स्पीक अप इंडिया`

राज्यातील जनतेने केंद्र सरकारला जागे करण्यासाठी लाईव्ह व्हिडिओबनविण्याचे आवाहन करुन, स्पिकअप इंडिया हा हॅशटॅग वापरून तो पोस्ट करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
balasaheb-thorat5
balasaheb-thorat5

संगमनेर : समाजातील गरीब जनता, मजूर, लघू व मध्यम उद्योजकांचा आवाज बुलंद करून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. 28) सकाळी 11 ते 2 या वेळेत `स्पीक अप इंडिया` ही आगळी वेगळी ऑनलाईन मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, की कोरोनासंबंधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना बुलंद आवाजात भाजपा सरकारपर्यंत पोचवण्यासाठी हे अभियान आयोजित केले आहे. यात देशातील गरिब कुटुंबाला 10 हजार रुपये हस्तांतरित केले जावेत, तसेच काँग्रेसप्रणित न्याय योजनेअंतर्गत आगामी सहा महिन्यांसाठी त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा करावेत. यासोबतच लघू व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक सहाय्य केल्यास मध्यम वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील.

राज्यातून स्थलांतरित होऊन स्वगृही परतणाऱ्या मजुरांचा प्रवासखर्चासहीत सर्व खर्च केंद्रातील भाजप सरकारने करावा. स्वगृही पोचल्यावर या श्रमिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा अंतर्गत 200 दिवसांपर्यंत काम मिळावे. या मागण्या स्वत:च्या सोशल मिडिया अकाऊंट वरून लाईव्ह येऊन, मोदी सरकारकडे मांडायच्या आहेत. यासाठी फेसबूक, ट्विटर, ईन्स्टाग्राम, युट्युब अशा सर्व सोशल मिडियाचा वापर करता येणार आहे. या शिवाय मजुर, लघु उद्योजक, शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांचाही आवाज मोदी सरकारापर्यंत पोचविला जाऊ शकतो.
या उपक्रमात राज्यातील जनतेने केंद्र सरकारला जागे करण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ बनविण्याचे आवाहन करुन, स्पिकअप इंडिया हा हॅशटॅग वापरून तो पोस्ट करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
 

हेही वाचा...

विमानतळाच्या धावपट्टीवरील पावसाचे पाणी पाझर तलावात 
शिर्डी : काकडी येथील शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवरून पावसाळ्यात वाहून वाया जाणारे पाणी शेजारच्या साठवण तलावात साठविण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज झाला. दुष्काळी टापूतील काकडीच्या ग्रामस्थांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. सुमारे 50 लाख रुपये खर्चाचे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना काळे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. 

काळे यांच्या हस्ते आज या कामाचा प्रारंभ झाला. शंकरराव काळे कारखान्याचे संचालक ऍड. सुनील रोहोमारे, बाबासाहेब गुंजाळ, अनिल गुंजाळ व विमानतळाचे सहायक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले, ""काकडी परिसर दुष्काळी आहे. मात्र, थोडा पाऊस झाला तरी विमानतळावरील धावपट्टीवर पाणी साचते. सुमारे अडीच ते तीन किलोमीटर लांब धावपट्ट्यांवरून ते वाहून वाया जाते. मध्यम पावसात या पाण्याचे प्रमाण मोठे असते. हे लक्षात घेऊन हे पाणी भुयारी जलवाहिनीद्वारे विमानतळाबाहेरील साठवण तलावात साठविण्याचे काम हाती घेतले आहे.'' 

एकाच वेळी साठवण तलाव खोदाई व भुयारी जलवाहिनीचे काम सुरू झाले. ग्रामस्थांच्या निरीक्षणानुसार, चांगला पाऊस झाला, तर या पाण्यातून सलग तीन साठवण तलाव भरतील. त्यातून शेतकऱ्यांना एखादे पीक घेता येईल. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासही मदत होईल. शिर्डी विमानतळाची पाणीयोजना कार्यान्वित होईल, त्या वेळी काकडीलादेखील त्याद्वारे पिण्याचे पाणी देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे काळे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com