अटक करताच सुजीत झावरे यांचा रक्तदाब वाढला, नगरला उपचार सुरू - As soon as he was arrested, his blood pressure rose | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

अटक करताच सुजीत झावरे यांचा रक्तदाब वाढला, नगरला उपचार सुरू

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली. त्यावेळी झावरे पोलिस ठाण्यातून निघून गेले होते. मात्र पोलीस त्यांच्या मागावरच होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले.

पारनेर : सरकारी कामात अडथळा, विनय भंग, खंडणी मागणे व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्या विरोधात काल रात्री उशिरा दाखल झाला. त्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झावरे यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या वेळी झावरे यांनी मीच पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी निघालो होतो, असे पोलिसांना सांगितले. मात्र त्यांना अटक करण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काल गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली. त्यावेळी झावरे पोलिस ठाण्यातून निघून गेले होते. मात्र पोलीस त्यांच्या मागावरच होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. झावरे यांना पारनेर येथे पोलीस घेऊन आल्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. म्हणून त्यांची पारनेर येथील सरकारी दवाखाण्यात तपासणी करण्यात आली. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नगरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नगरला सरकारी दवाखाण्यात नेण्यात आले, मात्र तेथे कोरोना रूग्णांसाठी सुविधा असल्याने त्यांना नगर येथील एका खासगी दवाखाण्यात दाखल केले. त्यांच्यावर आता पोलिसांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

झावरे आपल्या कार्यकर्त्यांसह कांदा निर्यातीच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता   झावरे यांना  तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमची बैठक सुरू आहे. जमावबंदी आदेशाचा विचार करून आपण पाच लोक येऊन निवेदन द्या, असे सांगितले. मात्र त्यानंतर या दोघांत वाद झाला होता. त्यामुळे तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, वाद झाल्यानंतर तहसीलदार देवरे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व स्वतः फिर्याद दिली. या वेळी त्यांची फिर्याद घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना खूप वेळ बसून ठेवले, असे समजते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख