सोम्या-गोम्याला गृहमंत्री करून उपयोग नाही ः दरेकर

परमवीर सिंह यांनी शंभर कोटी बद्दल माहिती देऊन राज्यभर मोठे राजकीय वादळ सुरू झाले. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्यासाठी भाजपने रान उठविले होते.
 Pravin darekar.jpg
Pravin darekar.jpg

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात बदल्या, खंडणीच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत चाैकशीतून उत्तरे मिळू शकतील. गृहखाते हे विश्वासार्हतेवर चालते. त्यावर त्या ताकदीचा माणूस असायला हवा. राज्यातील जनतेला शास्वत करणारे नेतृत्त्व आहे, सोम्या, गोम्याला मंत्री करून उपयोग नाही, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अशीच टीका भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटवर केली. त्या म्हणतात, की गृहमंत्र्यांचा राजीनामा, देर आये पर दुरुस्त नही आये, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील, म्हणजे `दुरुस्त आये` म्हणणे शक्य तरी होईल.

परमवीर सिंह यांनी शंभर कोटी बद्दल माहिती देऊन राज्यभर मोठे राजकीय वादळ सुरू झाले. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्यासाठी भाजपने रान उठविले होते. याबाबत भाजपचे नेते सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. 

नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच : राणे

नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे, असं दिसतंय. ज्यांना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली, त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेचे काय, मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना, अशी टीका भाजपनेते नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

हेही वाचा...

लसीकरणासाठी नगरसेवकाची जनजागृती 

श्रीरामपूर : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाने लसीकरणावर विशेष भर दिला आहे. परंतु लसीकरणाबाबत काही नागरिकांत अद्याप संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी व लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी व पुन्हा घरी येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. 

नगरसेवक बिहाणी यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये या मोहिमेचा नुकताच प्रारंभ केला. करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, प्रभागातील प्रत्येक घरी जावून लस घेण्याबाबत ते माहिती देत आहेत. घरी 45 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याचे आवाहन ते करीत आहेत. 

शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सुविधा आहे. तेथे जाण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गोरगरिबांना पायपीट करीत रुग्णालय गाठावे लागत. त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वचित राहण्याची भीती होती. बिहाणी यांनी या गोरगरीब रुग्णांना लस घेता यावी, यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी व पुन्हा घरी येण्यासाठी वाहनसुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे गोरगरिबांची सोय झाली आहे. 

शहरातील इतर प्रभागांतील नगरसेवकांनीही हा उपक्रम हाती घेवून लसीकरणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन बिहाणी यांनी केले. प्रभाग क्रमांक 15 मधील 100 नागरिकांचे दररोज लसीकरण केले जात आहे. लवकरच प्रभागातील 100 नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार आहे. प्रशासनाने ग्रामीण आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू केले, तसेच केंद्र नगरपालिकेच्या रुग्णालयात करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केली. 

या सुविधेमुळे लसीकरण मोहिमेस लस घेतलेल्या व्यक्तींना वाहनातून घरी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लसीकरणाबाबत लोकांमध्ये सकारात्मक जनजागृती करुन शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जावून लस घेण्यासाठी गरजूंसाठी मोफत वाहन व्यवस्था सुरु केली आहे. तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह लसीकरण झाल्यानंतर रुग्णालयातुन घरापर्यंत सोडले जात आहे. 
त्यामुळे अनेकांना दिलासा मिळात आहे. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com