एकाच अहवालाने संपूर्ण सथ्था काॅलनी बंद, पाचजण बाधित

सथ्था काॅलनी या परिसराच्या जवळ मार्केट यार्ड, सारसनगर, कोठी आदी परिसर आहे. यापूर्वी सारसनगर या परिसरात काही रुग्ण आढळले असल्याने हा परिसर काही दिवस सील होता.
Corona5
Corona5

नगर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सथ्था काॅलनीतील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आज सकाळी आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने या काॅलनीचे सर्व रस्ते बंद केले आहेत. 

दरम्यान, आज संगमनेर येथील दोन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच काल मृत्यू पावलेल्या कोरोनाग्रस्त महिलेचे दोन्ही जुळ्या बालकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आई पाॅझिटिव्ह असतानाही बालकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 124 वर आली असून, त्यातील 61 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 11 जणांचा आजपर्यंत मृत्यू झालेला आहे. आता संध्याकाळीही काही अहवाल येतील, त्यात किती पाॅझिटिव्ह येतात, त्यावरून आज दिवसभराचा आकडा किती सरकतोय, याबाबत प्रशासनामध्ये भिती आहे.

सथ्था काॅलनी येथील एका वृद्ध महिलेला श्वसन व सर्दीचा त्रास होत असल्याने तिच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. ही माहिती प्रशासनाला समजताच तिच्या कुटुंबातील नगरमधील सर्व व्यक्तींची तपासणी केली असता त्यामधील चार व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या.

सथ्था काॅलनी या परिसराच्या जवळ मार्केट यार्ड, सारसनगर, कोठी आदी परिसर आहे. यापूर्वी सारसनगर या परिसरात काही रुग्ण आढळले असल्याने हा परिसर काही दिवस सील होता. आता पुन्हा याच परिसरात रुग्ण आढळल्याने या परिसरावर पुन्हा गदा येणार आहे. 
 

हेही वाचा...

दोन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई 

नगर : तालुक्‍यातील दोन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली. अजून चार हजार शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा असून, पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याचे समजते. 

जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. मात्र, नगर तालुक्‍यातील काही शेतकरी यापासून वंचित होते. तालुक्‍यातील काही गावांतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदान वर्ग झालेले नव्हते. बॅंक खात्याच्या नंबरमध्ये एक अंक नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नव्हती. तालुक्‍यातील सहा हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा होती. याबाबत शेतकऱ्यांनी खासदार सुजय विखे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर विखे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या. नगर तालुक्‍यातील 1840 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. 

दरम्यान, याबाबत जिल्हा बॅंकेशी संपर्क साधून माहिती घेतली असता किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, याची माहिती आपल्याकडे अद्यापही उपलब्ध नाही. 
 
नगर तालुक्‍यातील सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान जमा झाले नव्हते. त्यातील दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी आपला जिल्हा बॅंकेसह प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे पाठपुरावा सुरू असून, ते लवकरच जमा करून घेणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com