श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे कोरोनाबाधित, हाॅस्पिटलमधून दिला हा संदेश - Shrirampur MLA Lahu Kanade Koronabadhit, gave this message from the hospital | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे कोरोनाबाधित, हाॅस्पिटलमधून दिला हा संदेश

मुरलीधर कराळे
गुरुवार, 16 जुलै 2020

मागील आठवड्यात नगरच्या एका आमदारांना कोरोना झाल्याचे वृत्त होते. तथापि, नाव जाहीर झाले नव्हते. आता मात्र स्वतः कानडे यांनीच हा व्हिडिओ त्यांच्या फेसबूक पेजवर व्हायरल केला आहे.

नगर : श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे व त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत आता ठणठणीत असून, त्यांनी हाॅस्पिटलमधून नागरिकांना संदेश देत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मागील आठवड्यात नगरच्या एका आमदारांना कोरोना झाल्याचे वृत्त होते. तथापि, नाव जाहीर झाले नव्हते. आता मात्र स्वतः कानडे यांनीच हा व्हिडिओ त्यांच्या फेसबूक पेजवर व्हायरल केला आहे. त्यांनी हाॅस्टिटलमधून दिलेला हा संदेश : 

नमस्कार मित्रांनो, 

मागील आठ-दहा दिवसांपूर्वी माझी कोरोनाचेी टेस्ट पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे मला हाॅस्पिटलाईज व्हावे लागले. बाईंचीही टेस्ट पाॅझिटिव्ह आली. त्याही हाॅस्टिलमध्ये आहेत. मागील आठ-दहा दिवसांपासून कोरोनाशी संघर्ष करण्यात गेले. अनेकजण माझ्या तब्येतीबद्दल विचारीत आहेत. या सर्वांना खात्रीशिर सांगतो, की आता कोरोनाचा जीवघेणा धोका टळलेला आहे. माझी आणि मॅडमची दोघांचीही तब्येत नाॅर्मल आहे. आता कोणतेही सिमटम्स नाहीत. आम्ही उपचाराला व्यवस्थित सामोरे जात आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. तुम्हा सर्वांचे प्रेम कोरोनावर मात करण्यासाठी बळ देत आहे. आगामी काळातही असेच बळ देत राहिल, याची मला खात्री आहे.

या निमित्ताने मी विनंती करेल, की कोरोनाचे हे जगभर आलेले संकट लगेचच संपेल असे होणार नाही. काही काळ जाणार आहे. आपल्याला त्याच्या सोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल. एक तर हे संकट जीवघेणे आहे, हे मनोमन समजून घेतले पाहिजे. त्यासाठी येथील डाॅक्टर्सने सांगितलेले नियम तंतोतंत पाळले पाहिजे. मास्क कायम वापरले पाहिजे. सोशल डिस्टन्सींग, स्वच्छता या गोष्टी पाळल्या पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचे आपण अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. म्हणजे या संकटावर आपल्याला मात करता येईल. लवकरच मला डिस्चार्ज मिळेल आणि मी आपल्या सेवेत रुजू होईल. तुमच्या आशिर्वादाबद्दल खूपखूप धन्यवाद !

कानडे यांनी या संदेशाद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मतदारसंघातून अनेकांकडून काळजी व्यक्त होत आहे. लोकांनी काळजी करू नये, असे आवाहन करीत त्यांनी सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची विनंतीही नागरिकांना केली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख