श्रीगोंद्याचे पोलिस जिगरबाज ! सिनेस्टाईलने पकडले 5 कोटींची सिगारेट - Shrigonda's police jigarbaj! Cinestyle seized 5 crore cigarettes | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

श्रीगोंद्याचे पोलिस जिगरबाज ! सिनेस्टाईलने पकडले 5 कोटींची सिगारेट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 जून 2020

रस्त्यावर अडथळे लावून सापळा लावला. रस्त्यावरील अडथळे करून ट्रकची चाैकशी केली जात होती. अशी चौकशी सुरू असताना एका ट्रक चालकाने अडथळे तोडून ट्रक पळवला. सानप यांनी दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून तो ट्रक पकडला.

श्रीगोंदे : पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी शिवारात 5 कोटी रुपयांचे सिगारेट घेवून जाणारे दोन ट्रक जात असल्याचे कळल्याने श्रीगोंद्याच्या जिगरबाज पोलिसांनी हे ट्रक सिनेस्टाईलने पकडले. रस्त्यावर लावलेले बॅरिकेट तोडून एक ट्रक पळाला होता, मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पकडला.

पुणे जिल्ह्यातील यवत येथून हा ट्रक काही लोकांनी पळविला होता. त्यामध्ये पाच कोटी रुपयांचे सिगारेट होते. दोन ट्रकमधून हा माल पुणे-नगर महामार्गावरून जात असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीगोंदे पोलिसांना कळविली. त्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह गव्हाणेवाडी येथे बंदोबस्तावर होते. त्यांनी रस्त्यावर अडथळे लावून सापळा लावला. रस्त्यावरील अडथळे करून ट्रकची चाैकशी केली जात होती. अशी चौकशी सुरू असताना एका ट्रक चालकाने अडथळे तोडून ट्रक पळवला. सानप यांनी दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून तो ट्रक पकडला. तोपर्यंत पुणे व शिरूर पोलिस पोचले. या कारवाईनंतर दोन्ही ट्रक व पाच आरोपींना (रा. मध्य प्रदेश) पुणे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 

हेही वाचा...

वकिलाच्या घरावर मिरजगाव येथे दरोडा

कर्जत : कोरोनामुळे केलेले लाॅकडाऊन सिथिल होताच दरोडेखोरांनी आपला मोर्चा दरोडे टाकण्याकडे वळविला आहे.काल मिरजगाव येथे दरोडा टाकून सोन्याच्या दागिणे लंपास करण्यात आले.

मिरजगाव येथील शिंगवी कॉलनीत ऍड. मधुकर कोरडे यांच्या घरात काल दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटून नेला. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांतील सोन्या ईश्वर भोसले (वय 25) व धोंड्या ईश्वर भोसले (वय 27, दोघे रा. बेलगाव, ता. कर्जत) या दोघांना अटक केली.

चोरट्यांनी बंगल्याच्या स्वयंपाकखोलीच्या दरवाजाची आतील कडी- कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. ऍड. कोरडे दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून कपाटातील नऊ तोळे सोने व चांदीचे काही दागिने मिळून अंदाजे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक प्रांजली सोनवणे व संजय सातव यांनी सकाळी घटनास्थळी पाहणी केली. त्यांच्या समवेत असलेल्या श्‍वानपथकाने काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत माग काढला. नंतर बहुधा दरोडेखोर मोटारीतून पळून गेले असावेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख