महिलांच्याच हस्ते कामांचा 'श्रीफळ' ! मंत्री शंकरराव गडाख यांचा पायंडा  - 'Shrifal' in the hands of women only! Minister Shankarrao Gadakh's foundation | Politics Marathi News - Sarkarnama

महिलांच्याच हस्ते कामांचा 'श्रीफळ' ! मंत्री शंकरराव गडाख यांचा पायंडा 

सुनील गर्जे
रविवार, 31 जानेवारी 2021

नेवासे नगर पंचायत अंतर्गत साडेतीन कोटीच्या निधीचे शहरातील रस्ता कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटारी अशा विविध विकास कामांचा मॅरेथॉन स्पर्धेस  माजी सभापती गडाख यांच्या हस्ते प्रारंभ झाला

नेवासे : नेवाशातील विविध विकास कामांचा प्रारंभ त्या-त्या प्रभागातील महिलांच्या हस्ते कामांचा 'श्रीफळ' वाढवून करण्याचा नवीन पायंडा नगरपंचायतीतर्फे पाडला. जलसंधारणंमत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विकास कामात महिलांचाही सक्रिय सहभाग यानिमित्ताने राहणार असल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. 

नेवासे नगर पंचायत अंतर्गत साडेतीन कोटीच्या निधीचे शहरातील रस्ता कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटारी अशा विविध विकास कामांचा मॅरेथॉन स्पर्धेस आज माजी सभापती गडाख यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

नंदकिशोर खरात महाराज, गहिनीनाथ आढाव महाराज, नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, नारायण लोखंडे, अनिल ताके, दिलीप जामदार, पोपट जिरे, अंबादास लष्करे उपस्थित होते. 

मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाने दर्जेदार विकासकामांच्या माध्यमातून नेवासे शहरासह उपनागराचा चेहरामोहरा बदलु, असा विश्वास महिला बचतगट चळवळीच्या नेत्या व पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केला. 

त्या म्हणाल्या की "नेवासेत मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. नेवासकरांनी सहकार्याची भूमिका घेऊन चांगल्या कामाच्या पाठीशी राहाणे गरजेचे आहे. कामे दर्जेदार होण्यासाठी नागरिकांनी देखील लक्ष घालावे. 

या वेळी गडाख यांच्या हस्ते खळवाडी, देशमुख गल्ली, लोखंडे गल्ली, कामिनपीर, नुराणी मस्जिद, रामकृष्णनगर, ज्ञानेश्वर मंदिर रस्ता परिसर, गंगानगर, लक्ष्मीनगर, अहिल्यानगरसह उपनगरातील विविध नऊ प्रभागातील कामांना प्रारंभ झाला. या कामाची महाराष्ट्रात चर्चा होत आहे.

 

हेही वाचा...

नेवाशात ज्येष्ठ पत्रकारांचा पुरस्काराने गौरव 

नेवासे : ज्येष्ठ पत्रकारांना 'पत्रकार रत्न' पुरस्काराने सन्मानित हा त्यांच्या आयुष्याचे तीन दशके केलेल्या पत्रकारितेचा योगदानाचा गौरव आहे, असे प्रतिपादन नेवाशाचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केले. 

नेवासे येथे साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार रत्न' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा नेवासे येथील श्रीराम मंदिरात पार पडला. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे, जयकुमार गुगळे, सूर्यकांत गांधी, दिलीप चुत्तर, सचिन कडू उपस्थित होते. 
जेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले, रामभाऊ पठाडे, मधुकर देशपांडे, बाळासाहेब तनपुरे, भाऊसाहेब पाठक, विजय भंडारी, नीलकंठ चौरे, शिवाजी पालवे, अशोक डहाळे, विजय गांधी, बन्सी एडके यांना 'पत्रकार रत्न' तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगर सेवकांना 'समाज रत्न' पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले. 

श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी या वेळी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रम स्थळी शुभेच्छा देत साई शिवार प्रतिष्ठानचे हे कार्य उत्कर्षाकडे जाईल, असे म्हणाले. डॉ. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले तर लक्ष्मीकांत डहाळे यांनी आभार मानले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख