पारनेर : "येथील वीज उपकेंद्रातून पुणे जिल्ह्यातील काही गावांना देण्यात येणारी वीज यापुढे दिली जाणार नाही, तसेच तालुक्यात कमी दाबाने होणारा वीजपुरवठा लवकरच कपॅसिटर बसवून सुरळीत केला जाईल. यापुढे तालुक्यात पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा केला जाईल,'' असे आश्वासन महावितरणचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपअभियंता आडभाई यांची आज भेट घेतली. तालुक्यात कमी दाबाने, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत चर्चा केली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
हेही वाचा... प्राशांत गायकवाड यांचे पवारांनी ऐकले
झावरे म्हणाले, ""पारनेरला कमी दाबाने वीजपुरवठा होत असताना, पारनेरची वीज पुणे जिल्ह्याला कशी देता? यापुढे पारनेरची वीज पुण्याला दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.''
उपअभियंता आडभाई म्हणाले, ""तालुक्यातून पुणे जिल्ह्याला होणारा वीजपुरवठा खंडित केला आहे. यापुढे पारनेरची वीज पुण्याला दिली जाणार नाही, तसेच शेतकऱ्यांचे वीजजोड तोडणार नाही.'' खंडू भुकन, ऍड. बाबासाहेब खिलारी, सोन्याबापू भापकर, अमोल साळवे, दीपक नाईक, किसन धुमाळ, लहू भालेकर, योगेश मते आदी उपस्थित होते.
हेही वाचा... पीक विम्याबाबत मोठी घोषणा
सरकारच्या भूमिकेने संभ्रम
झावरे म्हणाले, ""विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे वीजजोड तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र, अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजजोड तोडणार असल्याचे सांगितले. सरकारच्या या भिन्न भूमिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा...
विविध विकासकामांचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लोकार्पण
पारनेर : जनसेवेची कामे करणाऱ्या लोकनेत्याला जनता डोक्यावर घेऊन नाचत असते. त्याला निवडून येण्याची चिंता कधीच नसते. त्याची निवडणूक मतदारच हाती घेतात, त्यामुळे असे लोकनेते जनतेच्या गळ्यातील ताईत बनतात, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
सोबलेवाडी येथील 12 लाख रूपये खर्च करूण बांधण्यात आलेला सभामंडप, साडेसतरा लाख रूपयांचे स्मशानभूमीचे शेड व सहा लाख रूपये खर्चाच्या शेरकर वस्तीजवळ बांधण्यात आलेला बंधारा आदी कांमाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार लंके यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी नगरसेविका विजेता सोबले, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, शिक्षक नेते रा. या. औटी, नगरसेवक दिनेश औटी, विलासराव सोबले, दशरथ चेमटे, संजय मते, सचिन नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून सोबलेवाडी प्राथमिक शाळेच्या संरक्षण भितीच्या कामाचे भूमीपूजन व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटनही झाले. तसेच लोकसहभागातून विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, दप्तर, पाणी बॉटल व वह्यांचे वाटप ही करण्यात आले.
Edited By - Murlidhar Karale

