शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगरला घेरले कोरोनाने - Shivaji Kardile's Burhannagar was surrounded by corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."

शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगरला घेरले कोरोनाने

मुरलीधर कराळे
गुरुवार, 23 जुलै 2020

गावाला कोरोनापासून वाचविण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर आदींचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी कर्डिले यांनी सूचना केल्या आहेत.

नगर : भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले रहिवासी असलेल्या बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथे काल एकाच दिवशी 16 कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. तसेच यापूर्वीही मागील आठवड्यापासून तेथे रुग्ण आढळत असल्याने हे गाव बंद आहे. 

बुऱ्हाणनगर हे नगर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील बहुतेक भाग नगर महापालिकेच्या हद्दीजवळ आहे. नगर शहरातील तपोवन रोडजवळील भागही बुऱ्हाणनगर हद्दीतच येतो. त्यामुळे नगर शहराबरोबरच येथेही रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे गाव संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय मागील आठवड्यात झाला. गाव बंद ठेवले, तरीही रुग्ण वाढतच असून, प्रशासनाने तेथे तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. काल तर 16 रुग्ण सापडल्याने सरपंच तसेच पदाधिकारी चिंता व्यक्त करीत आहेत.

गावाजवळच कर्डिले यांची वस्ती आहे. गावाला कोरोनापासून वाचविण्यासाठी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर आदींचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी कर्डिले यांनी सूचना केल्या आहेत.

नगर तालुक्यातील 17 गावे कंटेंन्मेट झोन

नगर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे शहरालगतच्या 17 गावांमध्ये, खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार उमेश पाटील यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केले. घोसपुरी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, चास, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, नागरदेवळे, नवनागापूर, विळद, वडारवाडी, बुऱ्हाणनगर, पोखर्डी, निमगाव घाणा, टाकळी खातगाव, बाबुर्डी बेंद, रुई छत्तिशी. या गावांत अत्यावश्‍यक व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंध आहे.

नगर तालुक्‍यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 136 झाली आहे. त्यांतील 107 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुऱ्हाणनगरचे 16, नागरदेवळे एक, टाकळी खातगाव चार, सारोळा कासार तीन यांचा समावेश आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी गावे बंद केली आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात, तसेच काहींना खासगी लॅबमध्ये पाठविले जाते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गावे संपूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. बाधित गावांशेजारील अनेक गावांनी स्वतःहून "जनता कर्फ्यू' पुकारला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख