शिवाजी कर्डिले यांचा गुलाल तयार ! बिनविरोधसाठी वेगवान हालचाली - Shivaji Kardile Briking, Gulal ready! Fast movements for unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी कर्डिले यांचा गुलाल तयार ! बिनविरोधसाठी वेगवान हालचाली

मुरलीधर कराळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

गेल्या अनेक वर्षांपासून कर्डिले जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण करून त्यांनी सेवा संस्थांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

नगर :  अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या मतदारसंघातून नगर तालुक्यातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी केली आहे. त्यांच्यासमोर केवळ दोनच अर्ज आहेत. त्यांचीही माघारीची तयारी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे आज दुपारपरनंतर कर्डिले बिनविरोध होऊ शकतील. साहजिकच त्यांचा गुलाल तयार झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्डिले जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण करून त्यांनी सेवा संस्थांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघातील 108 सेवा संस्थांपैकी बहुसंख्य संस्थांचे ठराव आपल्या बाजुने असल्याचा दावा कर्डिले करीत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो.

हेही वाचा...  राष्ट्रवादी सोडून गेले तरीही अजित पवारांची गायकर यांच्याशी नाळ कायम

सध्या त्यांच्या विरोधात पद्मावती संपतराव म्हस्के व सत्यभामा भगवान बेरड यांचे अर्ज आहेत. हे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बॅंकेच्या राजकारणात भाजपच्या काही नेत्यांनी थोरात यांना विश्वासात घेतल्याचे मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही अर्ज आज मागे घेणार असल्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. अर्थात कर्डिले यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जामुळे `तारणहार`

गेल्या सहा महिन्यांपासून सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले. पहिले कर्ज असले, तरीही खेळत्या भांडवलासाठी किंवा गोपालनासाठी म्हणून हे कर्ज शेतकऱ्यांना अत्यल्प दरात मिळाले. त्यामुळे सेवा संस्थांनाही उर्जितावस्ता आली.

हेही वाचा... गायकर यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना व सेवा संस्थांना मिळालेले हा लाभ कर्डिले यांची जमेची बाजू ठरला आहे. त्याचबरोबर विरोधकांनीही विशेष ताकद लावली नसल्याने कर्डिले यांचे वर्चस्व निर्वाद राहिले आहे. त्यामुळे बिनविरोधचा मार्ग कर्डिले यांना सुकर असल्याचे सांगितले जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख