शिवसेनेची माघार ! `स्थायी`च्या सभापतीपदी मनोज कोतकर बिनविरोध होणार - Shiv Sena withdraws! Permanent Speaker Manoj Kotkar will be unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेची माघार ! `स्थायी`च्या सभापतीपदी मनोज कोतकर बिनविरोध होणार

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार मनोज कोतकर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे माघार घेणार आहेत.

नगर : महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार मनोज कोतकर बिनविरोध निवडून येणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे माघार घेणार आहेत. या नाट्यमय घडामोडीमुळे आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरावरील पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून कोतकर यांनी, तर शिवसेनेकडून गाडे यांनी अर्ज दाखल केले होते. कोतकर यांनी भाजपला अचानक रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करीत उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे भाजपला ऐनवेळी उमेदवार देणे शक्य नव्हते. या नाट्यमय घडामोडीत शिवसेना पुन्हा एकाकी पडली होती.

दरम्यान, यापूर्वीही महापाैर निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा महापाैर झाला. शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असूनही त्यावेळी काहीच करता आले नाही. या वेळी भाजपमच्या नगरसेवकाने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकाकी पडली.

वरिष्ठांच्या आदेशानुसारच माघार घेणार

वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेनेने माघार घेतली असून, याबाबतची घोषणा लवकरच जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करणार आहेत, असे शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख