नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन ! कंगनाचे पोस्टर जाळले, चित्रपटावरही बंदी - Shiv Sena in the city! Kangana's posters burnt, film also banned | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन ! कंगनाचे पोस्टर जाळले, चित्रपटावरही बंदी

मुरलीधर कराळे
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौकात तिच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले.

नगर : अभिनेत्री कंगना राणावत हिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौकात तिच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले. तसेच नगर जिल्ह्यात कंगणाचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहात सुरू होऊ देणार नसल्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

आंदोलनात शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा उपप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक योगिराज गाडे आदिंसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी सातपुते म्हणाले, की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या राज्यात आपले कमवतो, त्या राज्याच्या विरोधात भुमिका म्हणजे एक प्रकारे देशद्रोहच आहे. महाराष्ट्राने आपणाला नाव दिले, पैसे दिले, तरीही तेथील पोलिस, मुख्यमंत्री यांच्याबाबत बेताल व्यक्तव्य करुन एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. कंगणाच्या वक्तव्यांचा आम्ही शिवसैनिक तीव्र निषेध करतो. कंगणावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. या पुढे नगर जिल्ह्यात तिचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

कंगणाचे मानसिक संतुलन बिघडले ः बोराटे

बाळासाहेब बोराटे म्हणाले, की कंगणा राणावात हिने नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, अशा व्यक्तीला महाराष्ट्रात स्थान नाही. हे पार्सल परत पाठवून दिले पाहिजे. तिच्या सर्व कार्यक्रम व चित्रपटांवर बहिष्कार घालावा, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख