शिंदे-पवार भेट परिपक्व लोकशाहीचे लक्षण; यात गैर काही नाही- थोरात

व्यक्तीगत कामाच्या निमित्ताने आपण भेटणे, बोलणे, संबंध असणे यालाच परिपक्व लोकशाही म्हणतात.
Congress Minister Balasaheb Thorat News nagar
Congress Minister Balasaheb Thorat News nagar

संगमनेर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना, आपल्या देशात मात्र पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वच पातळ्यांवर महागाई वाढत असून, केंद्र सरकारची ही कृती चुकीची आणि  निषेधार्ह असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. (Shinde-Pawar visit a sign of mature democracy; There is nothing wrong with that) भाजपचे नेते राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट म्हणजे परिपक्व लोकशाहीचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले. संगमनेरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी विविध थोरात यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले, महामंडळाच्या समितीच्या स्थापनेची प्रक्रिया सुरु आहे. (Revenue Minister Balasaheb Thorat) यावर प्रत्येक आठवड्याला विचारविनिमय सुरु असतो. याशिवाय नव्याने करण्यात येणारे कृषी कायदे, बँकींग क्षेत्राकरिता केंद्राने केले नवीन कायदे यामुळे सहाकर क्षेत्रात निर्माण होणारी कठीण परिस्थिती यावर पवारांशी चर्चा झाली.

राम शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यात झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेवरही थोरात यांनी मत व्यक्त केले. पक्ष हा लोकशाहीचा भाग आहे. (Deputy Minister Ajit Pawar) जनकल्याण व देशाच्या हितासाठी लोकशाही व पक्ष आहेत. यात व्यक्तिगत काही नसते. व्यक्तीगत कामाच्या निमित्ताने आपण भेटणे, बोलणे, संबंध असणे यालाच परिपक्व लोकशाही म्हणतात. मला वाटतं या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

राज्यात दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाला आहे. या वर्षीही चांगला पाऊस होण्याची चिन्हे असल्याने, शेतकरी वर्ग उत्साहात मशागतीच्या कामाला जुंपला आहे. पुढील दोन तीन महिन्यांच्या काळासाठी म्हणून रासायनिक खतांचा साठा करण्यासाठी सध्या खते खरेदी केली जात आहे. खतांचा कोणताही तुटवडा राज्य सरकार निर्माण होवू देणार नाही, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेटेंचे विधान राजकीय..

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंबंधात बोलताना नुकतेच नक्षवाद्यांना जे कळते ते सरकारला का कळत नाही असे विधान केले होते, त्या अनुषंगाने बोलताना थोरात म्हणाले, त्यांच्या विधानाला फार महत्व देवू नका, त्यांचे बोलणे राजकिय स्वरुपाचे असते. मराठा समाजाच्या हितासाठी ते बोलत नाहीत. शिर्डी देवस्थानबाबत न्यायालयाने निर्देश दिल्याने विश्वस्त मंडळाचा निर्णय लवकरच करावा लागेल, असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com