आमदार लंके यांच्या या उपक्रमाने शरद पवार प्रभावित - Sharad Pawar was impressed by this initiative of MLA Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

आमदार लंके यांच्या या उपक्रमाने शरद पवार प्रभावित

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 24 जुलै 2020

सध्या शाळा बंद असल्याने विदयार्थ्यांचे शिक्षण बंद झाले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने तयार करण्यात आलेला ऑनलाईन शाळेचा पारनेर पॅटर्न शरद पवार यांना चांगलाच भावला.

पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून व तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी तयार केलेल्या ऑनलाईन शाळा या संगणक प्रणालीचे प्रात्यक्षिक काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लंके व गुंड यांनी दाखविले. ते पाहून पवार प्रभावित झाले. त्यांनी तात्काळ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबतची माहिती घेण्याचे सांगितले. ही माहिती घेऊन लवकरच पुणे येथे शिक्षण आयुक्त व संचालकांची बैठक होणार आहे. हा उपक्रम राज्यभरात राबविता येईल का, याची चाचपणी या वेळी घेण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रणालीचे उद्घाटन आज दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

सध्या शाळा बंद असल्याने विदयार्थ्यांचे शिक्षण बंद झाले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने तयार करण्यात आलेला ऑनलाईन शाळेचा पारनेर पॅटर्न पवार यांना चांगलाच भावला. गुंड यांच्या सहकार्यातून ऑनलाईन शाळेसाठी तयार केलेल्या संगणक प्रणालीची माहिती लंके यांनी पवार यांना दिली. या वेळी सुमारे 20 मिनिटे या सॉफ्टवेअरबाबत चर्चा झाली.  

गुंड यांनी पवार यांना तांत्रिक माहिती दिली. प्रत्यक्ष शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणात काय अडचणी येतात? त्या कशा सोडविल्या? याची माहितीही पवार यांनी घेतली. यापूर्वी व्हॉटस्अ‍ॅपच्या मध्यमातून विदयार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. त्यात विदर्थ्यांनी अभ्यास केला किंवा नाही? हे समजत नव्हते. ऑनलाईन शाळा या प्रणालीमध्ये विदयार्थ्याने किती प्रश्‍नांचा अभ्यास केला? किती विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी ऑनालाईन हजेरी लावली? विदयार्थ्यास एखादया विषयाचे किती अकलन झाले, याची माहिती मिळत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

हा उपक्रम राज्यात राबविता येईल का, याबाबत पवार यांनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या सोबत फोनवरून चर्चा केली. या सॉफ्टवेअरची माहिती घ्या, असे सांगितले. या सॉफ्टवेअरचा फायदा राज्यातील विदयार्थ्यांना करता येईल का, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गायकवाड यांनीही सॉफ्टवेअरची माहिती घेऊन या उपक्रमासंदर्भात पुणे येथे शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भातही  सूचना दिल्या असल्याचेही लंके यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख