शरद पवार यांनी पाठविले नगरकरांसाठी रेमडीसीवीर इंजेक्शन - Sharad Pawar sent Remadicivir for Nagarkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

शरद पवार यांनी पाठविले नगरकरांसाठी रेमडीसीवीर इंजेक्शन

मुरलीधर कराळे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

आमदार जगताप यांनी इंजेक्‍शनचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, खासगी रुग्णालये व कोविड सेंडरमध्ये बेड शोधण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शनची कमतरता असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार पवार यांनी जिल्ह्यासाठी काही इंजेक्शन पाठविले आहेत. ते गरीब रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. 

नगर जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्‍शनचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने लगेच तत्काळ पुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रेमडीसीवीरचा साठा नगरकरांसाठी पाठविला असून, तो गरजू रुग्णांना मोफत दिला जाणार आहे, असे जगताप म्हणाले.

आमदार जगताप यांनी इंजेक्‍शनचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भूपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख