शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शरद पवार बाहेर फिरू देत नाहीत - Sharad Pawar does not allow Chief Minister to go out to end Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शरद पवार बाहेर फिरू देत नाहीत

मुरलीधर कराळे
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो.

नगर : ``सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात. याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो,`` अशी टीका माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज केली.

जिल्हा बॅंकेच्या वतीने गोपालनासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटपाच्या कार्यक्रमानंतर कर्डिले बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोरोनाचे बिल एक ते दीड लाखाच्या पुढे येत आहे. आॅक्सिजन वेळेत मिळत नाही. बेड उपलब्ध होत नाही. कोरोनाचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे भरणे शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची एक प्रकारे लूट सुरू आहे. सरकार मात्र याकडे विशेष लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने मोठे संकट उभे आहे. उद्योग अडचणीत आहेत. युवकांना नोकऱ्या नाहीत. देशाचे नेते शरद पवार सांगतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. कॅप्टन घराबाहेर पडत नाहीत. कॅप्टनला मात्र बाहेर फिरू दिले जात नाही. शरद पवार मात्र या वयात जिल्ह्यात बाहेर पडतात. याच्यामागे एकच उद्देश दिसतो, की शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवायची, अशी टीका कर्डिले यांनी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख