सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी विश्वस्त बापुसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापुर ग्रामपंचायत पंधरा वर्षानंतर बिनविरोध झाली आहे.
शनिशिंगणापुर येथे असलेल्या दोन राजकिय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतमध्ये नेहमीच राजकीय कलगीतुरा रंगायचा. याचा अनेक विकास कामांवर परीणाम होत होता. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थान करीता गावातील मुळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वतीने पुर्ववत करुन आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत.
बिनविरोध सदस्य याप्रमाणे : शिवाजी जगन्नाथ शेटे, कल्पना शरद देठे, कुसुम जालिंदर दरंदले, बेबी भिमराज बानकर, पुष्पा बाळासाहेब बानकर, स्वप्नील
बाळासाहेब बोरुडे, वैशाली रमेश शेटे, बाळासाहेब बापुसाहेब कुऱ्हाट, राजेंद्र तुकाराम शेटे. देवस्थान ट्रस्टसाठी ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते. तसेच ग्रामपंचायतसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते. या ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टचे काम चांगले असून, त्यांनी ग्रामपंचायत विकास कामात महत्वाचे योगदान दिले आहे, असे मत बापुसाहेब शेटे यांनी व्यक्त केले.
बाहेरचे राजकारणी दिशाभूल करीत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्वस्त सर्वसमावेशक निवडले व ग्रामपंचायतही बिनविरोध झाली आहे, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुऱ्हाट यांनी सांगितले.
Edited By -Murlidhar Karale

