संगमनेरमध्ये ठरलं ! `माझे कुटुंब माझी जबाबदारी` प्रभावीपणे राबवायचं - Settled in Sangamner! `My family is my responsibility` to carry out effectively | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

संगमनेरमध्ये ठरलं ! `माझे कुटुंब माझी जबाबदारी` प्रभावीपणे राबवायचं

आनंद गायकवाड
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे.

संगमनेर : शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्व देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे `माझे कुटुंब माझी जबाबदारी` हे अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबवण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कोरोना तिसर्‍या टप्प्यात आला असून, त्याचा समर्थ मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट व गाव निहाय स्थापन केलेल्या आरोग्य समितीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करावी. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन करावे. या संकटाच्य़ा काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्व द्यावे. याबाबत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अधिक जागरूक होऊन आपल्या परिसरातील नागरिकांना सद्यस्थितीची माहिती देणे, कोरोनाची साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आहे.

या बैठकीत कोरोना प्रतिबंधासाठी तालुका व शहरातील प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सहकारी संस्थांच्यावतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर, तालुक्यातील रुग्ण तपासणी व्यवस्था याबाबतची माहिती घेत, थोरात यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही नागरिकांमधील कोरोनाचे कमी झालेले गांभीर्य व वाढत्या गर्दीविषयी चिंता व्यक्त केली.

या वेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे ,जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मिरा शेटे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, आदी उपस्थित होते.
 

Edited By - Murildhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख