नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये भाजपकडून सेवा सप्ताह - Service week from BJP in the city on the occasion of Narendra Modi's birthday | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये भाजपकडून सेवा सप्ताह

मुरलीधर कराळे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 जणांनी रक्तदान केले. तसेच सेवा सप्ताह आयोजित करण्यात आले.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये भाजपच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 जणांनी रक्तदान केले. तसेच सेवा सप्ताह आयोजित करण्यात आले असल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम न करता आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे नियोजन भाजपने केले. प्रा. बेरड, दरेवाडीचे सरपंच अनिल करांडे, सुभाष बेरड तसेच अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह पाळण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून मागील काही दिवसांपासून उपक्रम सुरू केले आहेत. सेवा सप्ताह आयोजित करून पंतप्रधानांच्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी परराष्ट्राशी वाढविलेले संबंध, त्यामुळे देशाचा होत असलेला फायदा लोकांना पटवून दिला. कोरोनाच्या काळात मोदी यांनी केलेल्या घोषणा, वेळेत लाॅकडाऊन, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी राबविलेल्या उपक्रम अशा अनेक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करून त्यानिमित्त 70 जणांनी रक्तदान केले. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्यान रक्तपेढी यांच्या सहकार्याने भाजपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख