कोरोना काळात सेवा केली ! एसटी चालक-वाहकांबरोबरच इतर कर्मचाऱ्यांनाही मिळावा भत्ता - Served during the Corona period! Allowance should be given to ST drivers and other employees | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोना काळात सेवा केली ! एसटी चालक-वाहकांबरोबरच इतर कर्मचाऱ्यांनाही मिळावा भत्ता

मुरलीधर कराळे
रविवार, 20 डिसेंबर 2020

चन्ने हे शासकीय कामासाठी नगरच्या दाैऱ्यावर होते. त्या वेळी देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

नगर : कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन सेवा केलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. ही योजना चालक-वाहकांसाठी असल्याने इतर विभागातील कर्मचारी या लाभापासून मुकणार आहेत. त्यांनीही कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने महामंडळाचे अध्यक्ष शेखर चन्ने यांना निवेदन दिले आहे.

महामंडळाचे वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक, इंधन भरणारे, लिपीक, इतर कर्मचारी या सर्वांनीच कोरोनाच्या काळात चांगली सेवा दिली आहे. परंतु भत्ता मिळण्याच्या या योजनेपासून हे कर्मचारी वंचित राहिल्याच्या तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांतून होत आहेत. याबाबत काॅंग्रेसच्या वतीने संबंधितांचे प्रश्न ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

चन्ने हे शासकीय कामासाठी नगरच्या दाैऱ्यावर होते. त्या वेळी देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात शहर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार काॅंग्रेसचे अध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले तसेच मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात कोरोनाचा संसर्ग झाल्यास विशेष रजा देण्यात यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही विमा संरक्षण मिळावे. कर्मचारी मयत झाल्यास 10 लाख नुकसान भरपाई द्यावी. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवासाच्या पहिल्या सत्रातील पासचा उपयोग दुसऱ्या सत्रात करण्याची परवानगी द्यावी, 50 वर्षावरील स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांऐवजी आठ महन्यांचा पगार देण्यात यावा, स्वच्छता, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक याबाबतची ठेका पद्धत बंद करून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना तेथे नोकरीची संधी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख