अहमदाबाद, चैन्नईत डोकावण्यापेक्षा मुंबई का तुंबते ते पहा : विखे पाटील - See why Mumbai is full instead of peeking in Ahmedabad, Chennai: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अहमदाबाद, चैन्नईत डोकावण्यापेक्षा मुंबई का तुंबते ते पहा : विखे पाटील

रविंद्र काकडे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

गेल्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई तुंबली त्याचं अपयशही सर्वस्वी तुमचंच आहे,” असे सांगून भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

लोणी : ”अहमदाबाद आणि चेन्नईत काय चालतं हे सांगू नका. दुसरीकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकून ठेवता येत नाही. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई तुंबली त्याचं अपयशही सर्वस्वी तुमचंच आहे,” असे सांगून भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. आज एका दैनिकातून मुंबई तुंबण्याची विविध कारणे देतानाच अहमदाबाद, चेन्नईत पाणी तुंबते, तेव्हा विरोधक गप्प का बसतात? असा सवाल करण्यात आला आहे. त्यावर विखे पाटील यांनी खरमरीत शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

विखे पाटील म्हणाले, की हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरीही मुंबई दरवर्षी तुंबते. नालेसफाई करताना अनेकांनी आपले हात साफ केले. या भ्रष्टाचाराची चाैकशीची मागणी आपण विधानसभेत केली होती, त्याचे काय झाले, हे त्यांनी सांगावे.

“मागील 25 वर्षांत मुंबईचे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत?,” असा सवाल करतानाच अहमदाबाद, चेन्नईकडे काय होतं हे सांगून दुसरीकडे बोट दाखवू नका. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख