पारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी`

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र, सरपंचदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने, सरपंचपद कोणाला, ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते.
sarpanch.png
sarpanch.png

पारनेर : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत पद्धतीने काढण्यात आले. या वेळी अनेकांची लॉटरी लागली, तर काहींचे चेहरे मात्र हिरमुसले. अनेकांच्या हातात बहुमत असूनही, त्या आरक्षणाचा सदस्य नसल्याने मोठी निराशा झाली. 

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र, सरपंचदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने, सरपंचपद कोणाला, ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते. शेवटी सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी तीन, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व खुल्या प्रवर्गासाठी तीन, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 31 जागांपैकी 15 जागा खुल्या, तर 16 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खुल्या प्रवर्गात 71 जागांपैकी 36 जागा महिलांसाठी, तर 35 जागा खुल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक गावात पारनेरसारखीच स्थिती झाली आहे.

तालुक्‍यातील आरक्षण असे : 

अनुसूचित जाती प्रवर्ग : पुरुष- जातेगाव, गुणोरे व घाणेगाव. महिला- पाबळ, धोत्रे बुद्रुक, वाघुंडे बुद्रुक. 
अनुसूचित जमाती प्रवर्ग : पुरुष- म्हसे खुर्द, कुरुंद व वडगाव दर्या, महिला- जामगाव, भोयरे गांगर्डा व वडझिरे. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष- कडूस, कासारे, वेसदरे, पिंप्री पठार, काताळवेढा, तिखोल, हिवरे कोरडा, मुंगशी, रुई छत्रपती, पानोली, रांधे, डिकसळ, वडनेर बुद्रुक, कळस व दैठणे गुंजाळ. महिला- हत्तलखिंडी, भांडगाव, वाळवणे, लोणी मावळा, पिंपळगाव रोठा, रांजणगाव मशीद, लोणी हवेली, पाडळी तर्फे कान्हूर, ढवळपुरी, राळेगण थेरपाळ, पिंपळगाव तुर्क, कान्हूर पठार, नांदूर पठार, नारायणगव्हाण, गोरेगाव, सांगवी सूर्या. 
खुला प्रवर्ग ः महिला- सिद्धेश्वरवाडी, करंदी, किन्ही, वडुले, गटेवाडी, सुपे, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळी आळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरी कासारे, बाभूळवाडे, दरोडी, निघोज, गांजीभोयरे, कोहकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे, पळसपूर, काळकूप, पळवे बुद्रुक, रायतळे, अस्तगाव, चिंचोली. पुरुष- पिंप्री जलसेन, वडगाव अमली, माळकूप, सारोळा आडवाई, अपधूप, हंगे, शहांजापूर, पिंपरी गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, पाडळी दर्या, जवळा, देवीभोयरे, शिरापूर, रेणवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, ढोकी, भोंद्रे, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वारणवाडी, वडगाव सावताळ, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुंडी. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com