कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात दुसऱ्या आठवड्यातही नगर जिल्हा प्रथमस्तरावर

कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी.
Rajendra bhosale.jpg
Rajendra bhosale.jpg

नगर : जिल्ह्यातील या आठवड्यातील (ता. 4 ते 10 जून) बाधित रुग्णदर हा २.६३ टक्के आणि ऑक्सीजन (Oxijan) बेडसची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्येचा दर हा १२.७७ टक्के इतका असल्याने नगर जिल्ह्याचा स्तर १ मध्येच समावेश करण्यात आला आहे. (For the second week in a row, the city district has been at the forefront of corona infection)

जिल्हा प्रशासनाने ता. 6 जून रोजी जारी केलेले आदेशच लागू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना उपाययोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्य शासनाने ता. चार ते दहा जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि आॅक्सििजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात नगर जिल्हा प्रथमस्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच ता. 6 जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे  जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले. की कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

नगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मात्र, याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिका आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळण्यास कोरोना संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू शकतील. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, आता निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे. निर्बंध शिथील झाले असले  तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com