रोहित पवार, राम शिंदे यांच्यात दुसऱ्यांदा भेट, काय झाली चर्चा !

आमदार पवार यांच्याउपस्थितीत शनिवारी पुणे येथील सिंचन भवनात 'कुकडी' च्या उन्हाळी आवर्तननासाठी निर्णय झाला असताना प्रा. शिंदे यांचे उपोषण होणार आहे. त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली.
rohit pawar 1
rohit pawar 1

जामखेड : 'पुण्यश्लोक आहल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त चौंडी येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार पुन्हा एकत्र आले. दोन राजकीय नेते ऐकत्र आल्यावर चर्चा तर होणारच! या वेळी चर्चा रंगली 'कुकडी' च्या आवर्तनाची. याला किना होती शिंदे यांच्या सोमवारी (ता. १) ला सुरु होणाऱ्या उपोषणाची.

आमदार पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 30)  पुणे येथील सिंचन भवनात 'कुकडी' च्या उन्हाळी आवर्तननासाठी निर्णय झाला असताना प्रा. शिंदे यांचे उपोषण होणार आहे. त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची आज 295 वी जयंती आहे. निमित्ताने आमदार रोहित पवार चौंडी येथे आले होते. या वेळी माजी मंत्री राम शिंदे आणि आण्णा डांगे उपस्थितीत होते. या वेळी शिंदे - पवार यांनी आहल्यादेवीच्या स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दरम्यान मिळालेल्या काही वेळेत 'कुकडी' च्या आवर्तनाची दोघांमध्ये चर्चा रंगली.  

अशी झाली चर्चा...

आमदार पवार : शनिवारी (ता. 6) जूनला 'कुकडी' चे पाणी सोडतोय.

प्रा. राम शिंदे : येईल का पण? निळवंडेतून पाणी कुकडीला यायचंय आणि कुकडीतून कर्जतला.

आमदार पवार :  हो येईल ना. ..!

(दोघांमध्ये हा संवाद सुरु असताना माजी मंत्री आण्णासाहेब डांगे या नेत्यांना न्याळत होते.)

माजी मंत्री शिंदे व आमदार पवार यांची ही दुसरी भेट

दरम्यान, माजी मंत्री शिंदे आणि आमदार पवार दुसऱ्यांदा एकत्र आले. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजता आमदार रोहित पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांच्या पराभवानंतर त्यांच्या निवास्थानी जाऊन शिंदे यांची भेट घेतली. तसेच शिंदे यांच्या आई-वडीलांचे अशिर्वाद घेतले होते. ही भेट राज्यभर चर्चेची ठरली होती. आमदार पवारांनी दाखविलेला सुसंस्कृत पण अनेकांना भावला होता. तसेच माजी मंत्री शिंदे यांनी त्यांचा फेटा बांधून केलेला सत्कार खिलाडू राजकारण्याचे प्रतिक ठरला होता. या प्रसंगी दोघांच्या कार्यकर्त्यांची फौज सोबत होती. त्यांनी तो क्षण अनुभवला होता. आज सकाळी नऊ वाजता दुसऱ्यांदा हा योग येथेच जुळून आला. दोघांसोबतही दोघांच्या कार्यकर्त्यांची फळी या वेळीही होती.

'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर चर्चा 

चौंडी (ता. जामखेड) येथे दरवर्षी होणारा आहल्यादेवीच्या जयंती उत्सवाचा जाहीर कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला. जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार रोहित पवार, अक्षय शिंदे, अविनाश शिंदेंच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरवर्षी माजी मंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाचा कार्यक्रम होतो. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातून अहिल्यादेवी भक्त येथे हजेरी लावतात. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मान्यवरांची ही या कार्यक्रमाला निमंत्रित केले जाते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचवीस वर्षापासून स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती असायची. त्यांच्या नंतर त्यांच्या कन्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याही या कार्यक्रमाला हजेरी लावत, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने नेते आपल्या सोयीनुसार स्वतंत्ररीत्या येथे येऊन अहिल्यादेवीला अभिवादन करणार आहेत.

सात वर्षा नंतर पुन्हा शिंदे यांचे आंदोलन 

कुकडीच्या अवर्तनासाठी सोमवारी  (ता. 1) होणाऱ्या उपोषण आंदोलनावर माजी मंत्री राम शिंदे ठाम आहेत. आज चौंडी येथे आमदार पवार यांच्यासोबत संवाद झाला असला, तरी शिंदे हे ठरलेल्या नियोजित अंदोलनावर ठाम आहेत. कर्जत तहसील कार्यालयासमोर त्यांचे सकाळी 11 वाजता उपोषण आंदोलन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com