सोमवारपासून शाळेची घंटी वाजणार ! कडक नियमांमुळे मुख्याध्यापकांची कसरत

राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यभरातील इयत्ता 9 ते 12 वी हे वर्ग सोमवार (ता. 23) पासून भरणार आहेत, तथापि, जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, तेथे मात्र सवलत देण्यात आली आहे.
school.png
school.png

नगर : जिल्ह्यात सोमवारपासून इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग भरणार असून, शाळांना कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्ती असल्याने मुख्याध्यापकांची मोठी कसरत होणार आहे. शाळा व्यवस्थापनाला सर्व साधनसामृग्रीसह सज्ज व्हावे लागणार आहे.  हे करीत असताना मुख्याध्यापकांची मात्र कसरत होणार आहे. कुठेही निमय मोडल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यभरातील इयत्ता 9 ते 12 वी हे वर्ग सोमवार (ता. 23) पासून भरणार आहेत, तथापि, जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, तेथे मात्र सवलत देण्यात आली आहे. तसेच हा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा असल्याने बहुतेक जिल्ह्यांत हे वर्ग भरण्यास मान्यता दिली आहे. नगर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

शाळा सुरू होणार असल्या, तरी मोठी नियमावली असल्याने शाळा व्यवस्थापनाला हे वर्ग भरविणे अधिक अवघड जाणार आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, हे पालकांवर अवलंबून राहणार आहे. ज्यांना पाठवायचे नसेल, त्या विद्यार्थ्यांनी घरीच आॅनलाईन अभ्यास करणे क्रमप्राप्त राहणार आहे. या शिवाय विद्यार्थ्यांची हजेरी सक्तीची नसल्याने किती विद्यार्थी नियमित उपस्थित राहणार, हे शाळा उघडल्यानंतर दिसून येणार आहे. असे असले, तरी काही पालक व विद्यार्थ्यांमधून मात्र उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाऊन शिक्षण घेणे अधिक सोयीस्कर होत असल्याने शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा अनेक पालक पाहत होते. काही गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे तेथील शाळांमध्ये वर्ग भरण्यास पालकांची पसंती आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी 9 ते 12 पर्य़ंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देताना अनेक नियमांची अंमलबजावणी करणे बंधणकारक केले आहे.

- शाळेत हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देणे
- थर्मामिटर, थर्मल स्कॅनिग, जंतुनाशके, साबण, पाणी आदी वस्तुंची उपलब्धता आवश्यक
- शाळेतील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आवश्यक
- वाहतूक व्यवस्थेचे निर्जंतुकीकरण
- क्वारंटाईन सेंटर असलेल्या शाळांचे पूर्ण निर्जंतुकीकरण करून देणे
- शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोवड-19 तपासणी आवश्यक
- स्वच्छतेबाबत जबाबदारीची गट तयार करून संबंधित कामे वेळेत करून घेणे
- स्टाप तरुम, वर्ग खोल्यांतील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर ठेवून करणे
- प्रत्येक वर्गात एका बाकावर केवळ एकच विद्यार्थी बसविणे. त्याच्या नावानिशी बैठक व्यवस्था करणे.
- शाळा परिसरात थुंकण्यावर बंदी
- रांगेत उभे राहण्यासाठी सहा फुटाचे अंतरावर वर्तुळ तयार करून घेणे
- पालकांची लेखी संमती घेणे
- पालक, विद्यार्थ्यांत जनजागृतीसाठी पत्रके प्रसिद्ध करणे
- विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसून, आॅनलाईनही अभ्यास करता येईल.
- आजारी विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नाही
- शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करणे
- वर्ग खोल्यांत स्पर्ष होणारा पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण
- कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट
- विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर सक्तीचा
- बस-कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- शाळेत शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची येण्याची व जाण्याची वेळ नोंदविणे
- शाळेच्या बाहेर गर्दी होऊ नये म्हणून पोलिस, स्वयंसेवकाची नेमणूक
-  प्रात्यक्षिके घेताना 50 टक्के उपस्थिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com