Satyajit Tambe made this request to Aditya Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरेंना सत्यजीत तांबे यांनी यासाठी केली विनंती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 मे 2020

पर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण किंवा विकास कामांसाठी वार्षिक निधी खर्च न करण्याची विनंती करीत त्याऐवजी हा निधी पॅकेज म्हणून पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा.

संगमनेर : पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी. पर्यटनस्थळांचे सुशोभिकरण करू नये, तर हा व्यवसाय जिवंत कसा राहिल, याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीचे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी भरभराटीचा काळ असतो. दुर्दैवाने याच काळात आलेल्या कोरोना या विषाणूजन्य घातक आजारामुळे देशभराततील उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण ठप्प झाले. त्यामुळे पर्यंटन उद्योगाला मोठा फटका बसला. या पुढील काळातही भविष्यातील अनिश्चिततेने या उद्योगाला ग्रासले आहे. या उद्योगाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. याबाबत काळजी व्यक्त करतानाच, सत्यजीत तांबे यांनी पर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण किंवा विकास कामांसाठी वार्षिक निधी खर्च न करण्याची विनंती करीत त्याऐवजी हा निधी पॅकेज म्हणून पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

केवळ हे क्षेत्र जिवंत ठेवा
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता सुशोभिकरण किंवा नवीन बांधकामासाठी सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये पर्यटकांना सुविधा देणे, पर्यटनाला चालना देणे अशा गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे तांबे यांनी म्हटले आहे.
 

हे ही वाचा...

सोशल डिस्टन्सचा फज्जा 

कोपरगाव : वैद्यकीय दाखला घेण्यासाठी परप्रांतीय व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 
येवला येथून कोपरगावला कामानिमित्त रोज किमान दोन हजार नागरिक येतात. येवला ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गावी जाण्यासाठी मागील तीन दिवसांत 500पेक्षा अधिक नागरिकांना वैद्यकीय दाखले देण्याचे काम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर या कामावर सतत लक्ष ठेवून आहेत. दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. 
पालेभाज्या, फळे व अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी शेजारील तालुक्‍यासह मालेगाव येथून छोटे-मोठे व्यापारी येत असतात. तालुक्‍यातील अनेक फळबागा मालेगावच्या बागवानांनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्रातील नागरिकांची ये-जा कोपरगावात होत आहे. तालुक्‍याच्या सीमा बंद असतानाही ही घुसखोरी सुरू आहे. याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचे ग्रामसुरक्षा दल निर्माण करून आपापल्या सीमा सांभाळण्याची आवश्‍यकता असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख