एकाच दिवशी एक हजार कोरोना रुग्ण घरी परतले, नव्याने वाढले 703   - On the same day a thousand corona healed and returned home, a new increase of 703 | Politics Marathi News - Sarkarnama

एकाच दिवशी एक हजार कोरोना रुग्ण घरी परतले, नव्याने वाढले 703  

मुरलीधर कराळे
रविवार, 20 सप्टेंबर 2020

दिवसभरात रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३३८ इतकी झाली आहे.

नगर : जिल्ह्यात काल एक हजार ५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३३८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १११, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत ३७० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८,  संगमनेर ३, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट ४, नेवासा २, श्रीगोंदा १०, पारनेर १, अकोले १, राहुरी ४, शेवगाव २०, जामखेड ३ आणि मिलिटरी हॉस्पिटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६२, संगमनेर १२, राहाता १६, पाथर्डी ११, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर १४, नेवासा १३, श्रीगोंदा ४, पारनेर १२, अकोले ४, राहुरी ३७, शेवगाव ३, कोपरगाव ३, जामखेड १६ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७० जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर १९, राहाता ५५, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ३०, श्रीरामपूर १२,  नेवासे १७, श्रीगोंदा ५, पारनेर १६, अकोले ४१, राहुरी ३२, शेवगाव १, कोपरगाव ३९, जामखेड ३१ आणि कर्जत १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 191 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 586 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 36 हजार 115 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख