शेतकरी-वारकरी महासंघाकडून साई संस्थानचे समर्थन, वाद नकोच !

देवस्थानची कीर्ती सातासमुद्रापार आहे. त्यामुळे नाहक वाद वाढवून कोणीही देवस्थानचा गैरफायदा घेत प्रसिद्धी मिळवू नये. भाविकांच्या वेशभुषेवियी आम्ही देवस्थानच्या सोबत आहोत.
शेतकरी-वारकरी महासंघाकडून साई संस्थानचे समर्थन, वाद नकोच !
sambhaji dahatonde.png

नगर : शिर्डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान आहे. केवळ प्रसिद्धीसाठी काही लोक देवस्थानाजवळ वाद वाढवित आहेत. सभ्य वेशभुषेत येणे, हे भारतीय संस्कृती टिकविण्याचे द्योतक असल्याने कोणी निष्कारण वाद वाढवू नये, असे आवाहन शेतकरी-वारकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून समर्थन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की साई संस्थानने विनंतीवजा हा फलक लावला आहे. त्यात गैर काहीच नाही. कोणत्याही महिला भक्तांना दर्शनासाठी प्रतिबंध करण्यात येत नाही. की कोणाच्या हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत नाही. साई संस्थानकडून भारतीय संस्कृती, रुढी-परंपराची जपवणूकच होत आहे. त्यामुळे शेतकरी-वारकरी महासंघाचा त्याला पाठिंबाच आहे. 

वेशभुषेविषयी समर्थन

देवस्थानची कीर्ती सातासमुद्रापार आहे. त्यामुळे नाहक वाद वाढवून कोणीही देवस्थानचा गैरफायदा घेत प्रसिद्धी मिळवू नये. भाविकांच्या वेशभुषेवियी आम्ही देवस्थानच्या सोबत आहोत, असे सांगून दहातोंडे यांनी अप्रत्यक्षपणे तृप्ती देसाई यांना इशाराचा दिला आहे.

दरम्यान, येत्या दहा तारखेस शिर्डी येथे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई येणार असून, त्या देवस्थानने लावलेल्या फलकाला विरोध करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीत वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देवस्थानला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

साईबाबांनी `सबका मालिक एक` अशी शिकवण दिली. त्यामुळे देवस्थानजवळ कोणावरही अन्याय होणार नाही, अशी संस्थानची कायम भूमिका असते. त्यामुळे देवस्थानने घेतलेला निर्णय चुकीचा नाही. देवस्थानच्या वतीनेे आजही कोणत्या्ही महिला किंवा पुरुषांना दर्शनासाठी अडविले नाही. असे असताना वाद वाढवू नये, अशीच अपेक्षा शिर्डीतील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे आर्थिक देणग्या बंद आहेत. देवस्थानचा होणारा खर्च सुरूच आहे. त्यामुळे सर्वच देवस्थाने अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता कोणत्याही देवस्थानाजवळ वाद वाढवू नये, असे भाविकांचे मत आहे. त्यामुळे भाविकांनी, समाजातील तज्ज्ञांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in