शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी या उपक्रमासाठी रोहित पवारांची विनंती - Rohit Pawar's request for this initiative for Sharad Pawar's birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी या उपक्रमासाठी रोहित पवारांची विनंती

मुरलीधर कराळे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

रोहित पवार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त यापूर्वी रक्तदान शिबिरे आयोजित करून सुमारे दोन हजार बाटल्या रक्त संकलित केले होते. ते गरजू रुग्णांना देण्यात आले.

नगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबरला आहे. त्या निमित्त आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाजाला एका महत्त्वाच्या उपक्रमाबाबत विनंती केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

रोहित पवार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त यापूर्वी रक्तदान शिबिरे आयोजित करून सुमारे दोन हजार बाटल्या रक्त संकलित केले होते. ते गरजू रुग्णांना देण्यात आले. ब्लड बॅंकांच्या सहकार्यातून राबविलेल्या या उरक्रमामुळे अनेक गरजुंना फायदा झाला.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांनी रुग्णांवरील शस्त्रक्रिया गेल्या आठ-दहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. परंतु त्या आता यापुढे थांबवू शकणार नाहीत. कोरोनाच्या काळात रक्त उपलब्ध होणे शक्य नव्हते. आता मात्र त्याची गरज पडणार आहे. सध्या कोरोनाचे सावट असले, तरी लाॅकडाऊन नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. परिणामी अपघातही होताना दिसत आहेत. अशा वेळी रक्तांचा तुटवडा जाणवत आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा दुर करावा, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.

कोरोना झालेल्या रुग्णांसाठी आवाहन

कोरोना झालेल्या रुग्णांच्या शरीरात अॅंटीबाॅडीज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी गरजुंना आवर्जुन रक्तदान करावे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले कर्तव्य समजून जवळील रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे. रक्तपेढ्यांनीही रुग्णांना अत्यल्प दरात रक्त उपलब्ध करून द्यावे. प्लाझ्मा दान करणे, ही सध्याच्या परिस्थितीत काळाजी गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.

कार्यकर्त्यांच्या अशाही कमेंटस

या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी अनेक कमेंट दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान करणार, असे कार्यकर्त्यांनी आवर्जुन सांगितले आहेत. तर काहींनी आपापल्या भागातील इतर प्रश्नही कमेंटच्या माध्यमातून आमदार पवार यांच्यापर्यंत पोहचविले आहेत. रस्त्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी, शाळा सुरू करण्याबाबतच्या अडचणी या कमेंटच्या माध्यमातू मांडल्या आहेत. काहींनी आमदार पवार यांना मागील आश्वासनाची आठवण करून दिली आहे. दिवाळीनंतर येणार होता, आता आमच्याकडे या, असेही अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी आपल्या संस्थेत मला नोकरी मिळावी, अशीही विनंती केली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख