`कोंबड्याची पिल्ले विकली` या शिंदे यांच्या आरोपावर रोहित पवार यांचे हे उत्तर - This is Rohit Pawar's reply to Shinde's allegation that he sold chickens | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

`कोंबड्याची पिल्ले विकली` या शिंदे यांच्या आरोपावर रोहित पवार यांचे हे उत्तर

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

कर्जत-जामखेड येथे विकासाची पेरणी केली आहे. सर्वसामान्यांच्या मदतीने खत घालून या मादीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पिक लवकरच बहरात येणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

नगर : ``रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्ले विकली, मासे, बी-बियाणे इकडे आणून विकली,`` या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहे. ``मला जाहिरातबाजी करायची नाही, लोकांना ही कामे जनतेसमोर मांडणे माझे कर्तव्य समजतो,`` अशा शब्दांत पवार यांनी उत्तर दिले.

कर्जत येथे प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा केली. बारामती पॅटर्नवर टीका करून आमदार पवार यांनी जनतेसाठी काय दिले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पवार यांनी फेसबूकवर कामांची माहिती दिली. ते म्हणाले, की जामखेेड-कर्जतवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर गुलाल टाकला आहे. त्या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. हा कालावधी खूप छोटा आहे. तरीही मतदारसंघाच्या विकासासाठी मी अनेक कामे करू शकलो. याची गोळाबेरीच मी सोशल मीडियावर मांडली. लोकांना कामे दिसतच असतात. मला कामांची जाहिरातबाजी करायची नाही, असा टोला त्यांनी दिला.

कर्जत-जामखेड येथे विकासाची पेरणी केली आहे. सर्वसामान्यांच्या मदतीने खत घालून या मादीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पिक लवकरच बहरात येणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख