रोहित पवारांच्या मातुःश्री जिद्दीला पेटल्या ! म्हणाल्या, अन्यथा सत्कार स्विकारणार नाही - Rohit Pawar's mother Shri Jiddi on fire! Said, otherwise the reception would not be accepted | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवारांच्या मातुःश्री जिद्दीला पेटल्या ! म्हणाल्या, अन्यथा सत्कार स्विकारणार नाही

वसंत सानप
बुधवार, 27 जानेवारी 2021

सत्कार स्विकारणार नाहीत; या संकल्पाच्या निमित्ताने शहराच्या स्वच्छते प्रती त्यांची असलेली तळमळ आणि जनजागृतीसाठी सुरु असलेला प्रयत्न प्रभावीपणे पहायला मिळतो.

जामखेड : जामखेड शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात जोपर्यंत क्रमांक येत नाही, तोपर्यंत आपण जामखेडकरांकडून सत्कार स्विकारणार नाही, असा संकल्प आमदार रोहित पवार यांच्या मातुःश्री सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी केला.

सत्कार स्विकारणार नाहीत; या संकल्पाच्या निमित्ताने शहराच्या स्वच्छते प्रती त्यांची असलेली तळमळ आणि जनजागृतीसाठी सुरु असलेला प्रयत्न प्रभावीपणे पहायला मिळतो.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सत्तेत परिवर्तन झाले; पस्तीस वर्षांपासून येथील मतदारांची निर्माण झालेली मानसिकता बदलली आणि भाजपाच्या विचाराचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला. गेल्या वर्षभरापासून येथील नागरिकांची मानसिकता बदलून येथे बदल घडवून आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना त्यांचे अख्खे कुटुंब मदतीसाठी मतदारसंघात धावून आले आहे. यामध्ये वडील राजेंद्र पवार, आई सुनंदाताई पवार आणि पत्नी कुंतीताई पवार यांचा समावेश आहे.

राजेंद्र पवारांनी येथील शेती आणि शेतकरी शाश्वत बदलासाठी काम सुरु ठेवले आहे. तर मातुःश्री सुनंदाताई यांनी महिला बचत गट,स्वच्छता, सामाजिक प्रबोधन या व इतर विविध उपक्रमांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यांच्या स्नुषा कुंतीताईंची देखील त्यांना मदत मिळते.

कोणताही उपक्रम राबविताना सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई ह्या 'मिशन' म्हणून हाती घेतात. तसेच उपक्रमा दरम्यान 'शिस्त' सक्तीची ठरलेली. निटनेटकेपणा, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा ही 'त्रिसूत्री' घेऊन त्यांचे काम सुरू आहे.

प्रसंगी त्या कठोर होतात. जामखेड शहर स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत खूपच पिछाडीवर आहे, याची खंत त्या व्यक्त करीत आहेत. समाजातील विविध घटकांनी,संघटनांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं, याकरिता काम करावं, असा त्यांचा होरा आहे. हे समाज मनावर बिंबविण्यासाठी त्यांनी जो पर्यंत स्वच्छता सर्वेक्षणात जामखेडचा क्रमांक अग्रभागी येत नाही; तोपर्यंत जामखेडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात जामखेडकरांकडून सन्मान अथवा सत्कार स्विकारणार नाही; असा संकल्प सोडला आहे. त्यांच्या या संकल्पापाठी मागील भूमिका जामखेडकरांनी समजून घ्यावी आणि स्वच्छता सर्वेक्षण उपक्रमात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा ऐवढेच..!

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख