खडसे पक्षांतरावर रोहित पवार यांनी केले वेलकम, राम शिंदे म्हणाले होईल पश्चाताप  - Rohit Pawar welcomed Khadse's resignation, Ram Shinde said he would regret it | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे पक्षांतरावर रोहित पवार यांनी केले वेलकम, राम शिंदे म्हणाले होईल पश्चाताप 

मुरलीधर कराळे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

गेल्या काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये नाराज होते. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आता प्रवेश निश्चित झाल्याने राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज हे जाहिर झाल्यानंतर जामखेड-कर्जत मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले, तर भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी खडसे यांना पश्चाताप होईल, अशी टीपन्नी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये नाराज होते. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आता प्रवेश निश्चित झाल्याने राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. वेलकम एकनाथ खडसे साहेब ! असे ट्विट करून आमदार रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे.

भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मात्र खरपूस शब्दांत खडसे यांना समाचार घेतला आहे. एका माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, की खडसे यांना भाजपमध्ये चांगली किंमत होती. आता राष्ट्रवादीत तेव्हढी मिळणार नाही. तेथे गेल्यानंतर त्यांना नक्की पश्चाताप होईल. त्यांच्यासोबत इतर कोणताही नेता जाणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष वाढत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख