Risk of corona infection: Thorat | Sarkarnama

कोरोना संक्रमनाच्या टप्प्यावर येण्याचा धोका ः थोरात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 एप्रिल 2020

बाळासाहेब थोरात रोज आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सातत्याने पदाधिकारी, कॉंग्रेस कार्यकर्ते, प्रशासनाबरोबर उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतात.

संगमनेर : ""कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन व प्रशासकीय पातळीवर योग्य उपाययोजना सुरू आहेत. मात्र, कायदा न जुमानता विनाकारण घराबाहेर पडणे चिंताजनक आहे. कोरोना संक्रमणाच्या टप्प्यावर येण्याचा धोका निर्माण झाला असून, संचारबंदीचा नियम पाळून सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे,'' असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले.

थोरात यांनी आज नगर जिल्हा व संगमनेरमधील कोरोना उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश जाजू, प्रकाश कलंत्री यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व व्यापारी, नगरसेवक सहभागी झाले होते.

रोज घेतात सर्व जिल्ह्यांचा आढावा
थोरात रोज आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सातत्याने पदाधिकारी, कॉंग्रेस कार्यकर्ते, प्रशासनाबरोबर उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतात. संगमनेरमधील उपाययोजना, लॉकडाउन व संचारबंदीची परिस्थिती, हॉट स्पॉट, तसेच शहरातील सर्वसामान्यांची परिस्थिती, मजूर वर्ग व होम क्वारंटाईन केलेले संशयित यांची माहिती घेत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना, हे संकट आपल्या घरापर्यंत पोचले असून, नागरिकांनी घरात सुरक्षित राहून कायद्याचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख