`दारु पिऊ नकोस बाळ, कठीण आहे काळ`, म्हणताच त्याने घेतला वृद्ध वडीलाचा जीव - As a result of the sale of alcohol, the boy killed his father by saying no to alcohol | Politics Marathi News - Sarkarnama

`दारु पिऊ नकोस बाळ, कठीण आहे काळ`, म्हणताच त्याने घेतला वृद्ध वडीलाचा जीव

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 मे 2020

अकोले :  "दिवस फार कठिण आहेत, दारू पिऊ नको, कशासाठी पितोस, कुटुंबाची रांगोळी करतोस. इथे खायला धान्य नाही आणि तू दारुत खर्च करतोस," असे समजावून सांगणाऱ्या सत्तर वर्षीय वडीलाला मुलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारले. बोरी (ता. अकोले) येथे ही घटना घडली.

अकोले :  "दिवस फार कठिण आहेत, दारू पिऊ नको, कशासाठी पितोस, कुटुंबाची रांगोळी करतोस. इथे खायला धान्य नाही आणि तू दारुत खर्च करतोस," असे समजावून सांगणाऱ्या सत्तर वर्षीय वडीलाला मुलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारले. बोरी (ता. अकोले) येथे ही घटना घडली.

भागवत गोमा कांबळे (वय 70) असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्याचा मुलगा राजेंद्र भागवत कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मद्यपी मिळेल तेथून व सांगेन त्या किमतीने दारू खरेदी करीत आहेत. मोठ्या कष्टाने मिळविलेली दारू मनसोक्त पिण्यास मनाई करणाऱ्या वडीलाचा राग येवून आज मुलाने त्यांचा जीव घेतला. झालेले कृत्य समाजाला काळीमा फासणारे आहे. 

राजेंद्र भागवत कांबळे हे वडील भागवत व मुलगी निकिता यांच्यासह बोरी येथे राहतात. रविवारी दुपारी राजेंद्र कांबळे हा दारू पिऊन आला. त्याचे वडील भागवत यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे बाबा, दिवस फार खराब आहेत. नेहमी दारू पिऊ नको, असे समजावून सांगत होते. असे बोलल्याचा राग येवून राजेंद्र याने त्याच्या वडीलाच्या मानेवर, डोक्यावर, छातीवर जोरदार मारहाण केली. सत्तरवर्षीय वडील त्या मारामुळे गतप्राण झाले. ही घटना निकिता हिच्यासमोर घडली. त्यामुळे तिने वडीलाच्या विरोधात अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा करून आरोपीस अटक केली आहे. दरम्यान राजेंद्र हा कायम दारू पित असल्याने त्याची पत्नीही माहेरी गेल्याचे समजते.

दरम्यान, महाराष्ट्रात लाॅक डाऊनमध्ये दारु विक्री केल्याचे दुष्परिणाम आदिवासी भागात भोगावे लागत आहेत. दारुबंदी होती, तोपर्यंत लोक शांत होते. आता मात्र एकमेकांत भांडणे सुरू झाली आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 
 

हीही वाचा...

टोमॅटो उत्पादकांना नुकसानभरपाई मिळावी

अकोले : अकोले तालुक्यात टोमॅटो पिकावर गूढ व्हायरस असल्याने एक हजार एकर क्षेत्र बाधित झाले असून, जवळपास साठ कोटीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी कृषी मंत्री, आयुक्त व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

नोव्हेंबर/फेब्रुवारी मध्ये तालुक्यात एक हजार एकरवर लागवड केलेल्या नामांकित कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या टोमॅटो पिकावर गूढ व्हायरस आढळला आहे. त्यामुळे सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सध्या लॉकडाऊन मुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. टोमॅटो व्हायरस कशामुळे आला आहे किंवा बियाणे खराब आहे, याचा कृषी विधापीठ संशोधन पथक व बॅंगलोर प्रयोगशाळा अहवाल तातडीने मागवून घ्यावा व जबाबदार असलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पिचड यांनी केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख