श्रीगोंद्यात 86 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण - Reservation of 86 Gram Panchayat Sarpanch posts in Shrigonda | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंद्यात 86 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण

संजय आ. काटे
गुरुवार, 28 जानेवारी 2021

तालुक्यात झालेल्या 59 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज निघाले. त्यासोबतच पुढच्या टप्यात होणाऱ्या 27 ग्रामपंचायत सरपंचपदाचेही आरक्षण काढण्यात आले.

श्रीगोंदे : तालुक्यात झालेल्या 59 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज निघाले. त्यासोबतच पुढच्या टप्यात होणाऱ्या 27 ग्रामपंचायत सरपंचपदाचेही आरक्षण काढण्यात आले. घोटवी येते बहुमत असतानाही विरोधकांची दोन सदस्य असणाऱ्या गटाला सरपंचपदाची आरक्षण लाॅटरी लागली. तर बाबुर्डी, वडाळी व घोडेगाव या ग्रामपंचायतीत जे आरक्षण निघाले, त्या आरक्षीत जागेचे सदस्यच नाहीत. तेथील आरक्षण निर्णय जिल्हाधिकारी घेतील, असे प्रांतअधिकारी सुधाकर भोसले यांनी स्पष्ट केले. आज प्रांताधिकारी भोसले व तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे आरक्षण निघाले आहेत.

श्रीगोंदे तालुक्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे - 

अनुसूचित जाती व्यक्ती -  गावांची नावे- भावडी, घुगलवडगाव, बाबुर्डी, गव्हाणेवाडी, कौठे, बोरी.

अनुसूचित जाती महिला- महांडूळवाडी, घोगरगाव, सुरोडी, म्हसे, सुरेगाव, घोडेगाव. 

अनुसूचित जमाती व्यक्ती- कोकणगाव, माठ, घोटवी.

अनुसूचित जमाती महिला-  आर्वी, वडाळी. 

सर्वसाधारण व्यक्ती- पेडगाव, बेलवंडीबुद्रुक, आढळगाव, मढेवडगाव, वांगदरी, निमगावखलू, चांडगाव, पिसोरेखांड, तांदळीदुमाला, चिखली, सांगवीदुमाला, ढवळगाव, कोथूळ, देवूळगाव, एरंडोली, रायगव्हाण, अरणगावदुमाला, कामठी, निंबवी, थिटेसांगवी, कोंडेगव्हाण, चोराचीवाडी, कोरेगाव.

सर्वसाधारण महिला- पिंप्रीकोलंदर, देवदैठण, येवती, कोरेगव्हाण, मुंगुसगाव, पारगावसुद्रीक, चवरसांगवी, भानगाव, ढोरजे, खांडगाव, हिरडगाव, बेलवंडीकोठार, टाकळीकडेवळीत, शेडगाव, वेळू, आनंदवाडी, लोणीव्यंकनाथ, चिंभळे, शिरसगावबोडखे, लिंपणगाव, म्हातारपिंप्री, गार.

नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती-कोळगाव, पिंपळगावपिसे, येळपणे, घारगाव, मांडवगण, चिखलठाणवाडी, काष्टी, हिंगणीदुमाला, घुटेवाडी, बनपिंप्री, अधोरेवाडी, हंगेवाडी.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला-राजापुर, अजनूज, उक्कडगाव, चांभुर्डी, उखलगाव, तरडगव्हाण, रुईखेल, टाकळीलोणार, कोसेगव्हाण, विसापुर, सारोळासोमवंशी. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख