1sarpanch_43.jpg
1sarpanch_43.jpg

दिग्गजांचे नातेवाईक रिंगणात : भावकी सांभाळावी की गावकी

गुंडेगावात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या समोर बबन हराळ यांची गावातील युवा शक्तीच्या जोरावर आव्हान तयार केला आहे.

नगर तालुका : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून तालुक्‍यातून जिल्हा परिषद पदाधिकारी, आमदार, खासदार मंत्रीपदाचा मान मिळवलेल्या दिग्गजांच्या नातेवाईक व मातब्बरांच्या निवडणुकीकडे जिल्ह्यासह नगर तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

निंबळक येथे जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या गटासमोर त्यांचे पुतणे शरद लामखडे व शिवसेनेचे दत्ता कोतकर यांनी कडवी झुंज रंगणार आहे. आदर्शगाव मांजरसुंबेमध्ये सत्ताधारी जालिंदर कदम यांच्या विरोधात त्यांचेच चुलत बंधू राम कदम यांची जुगलबंदी चांगलीच रंगात आली आहे.

चिचोंडी पाटीलमध्ये सत्ताधारी शरद खंडू पवार यांच्या विरोधात पंचायत समितीचे सभापती इंजिनिअर प्रवीण कोकाटे व भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी एकत्र येत पवारांसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. यात बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे व ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

गुंडेगावात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या समोर बबन हराळ यांची गावातील युवा शक्तीच्या जोरावर आव्हान तयार केला आहे. पिंपळगाव माळवीत सत्तधारी सुभाष झिने व प्रताप झिने यांच्या विरोधात महाविकास अघाडीच्या माध्यामातून ताकद उभारली आहे. 

जेऊरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव गवारे, सुनील पवार, माजी सरपंच विकास कोथंबिरे, मधूकर मगर यांच्यात व महाविकास अघाडीचे भास्कर मगर, अरूण ससे, अंबादास पवार यांची तुल्यबळ लढत रंगण्याची चिन्हे आहेत. टाकळी काझीतील कॉंग्रेसचे तालुका प्रमुख संपत म्हस्के यांना शिवसेनेच्या शंकर ढगे यांनी गावातच खिळवून ठेवल्याने म्हस्के यांना तालुक्‍यात प्रचारासाठी फिरणे अवघड झाले आहे.

विळदमध्ये 20 वर्षांचा संघर्ष टाळुन आडसुरे- जगताप यांनी ग्रामविकासासाठी एकत्र मोट बांधली आहे. देहरेतील पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, अरुण लांडगे व अंबादास काळे या मातब्बरांसमोर युवा पिढीने चांगलाच संघर्ष उभा केला आहे. स्वर्गीय दादापाटील शेळके यांचे नातू व जिल्हापरिषदचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचे पुतणे यांनी अंकुश शेळके यांनी खारेकर्जुनेत युवाशक्तीचे संघटन करत अंतर्गत विरोधकांना कडवा संघर्ष देत आहेत. रुईछत्तीसीत रमेश भामरे यांच्या विरोधात महाविकास अघाडीकडून पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर यांची कडवी झुंज होईल.

शहरा लगत असलेल्या नवनागापूरमध्ये गेल्या ग्रामपंचायतला एकमेकांच्या विरोधात लढलेले दत्ता सप्रे व डॉ. बबनराव डोंगरे एकत्र आले आहेत. त्यांना बंडू सप्रे यांनी विकासकामाच्या माध्यमातून कडवे आव्हाण दिले आहे. एकुणच तालुक्‍यात महाविकास आघाडीचे प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या भविष्यातील लढतीची नांदी ठरणार आहे. 

बुऱ्हाणनगरची जोरदार चर्चा 

सध्या बुऱ्हाणनगरची चांगलीच चर्चा आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपले पुतणे रोहिदास कर्डिले यांच्या समोरच आपले कार्यकर्ते वैभव वाघ यांचे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com