रेखा जरे हत्याकांड ! तिघांना पोलिस कोठडी, मास्टरमाईंडचा तपास सुरू

संबंधित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ही हत्या कट रचून केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यामागील मास्टरमाईंडच्या शोधात पोलिस आहेत.
rekhe jare.png
rekhe jare.png

नगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माजी पदाधिकारी तथा यशस्वी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे (वय 40) यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या तिघांना आज पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या तिघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

संबंधित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ही हत्या कट रचून केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यामागील मास्टरमाईंडच्या शोधात पोलिस आहेत.

सोमवारी सायंकाळी जरे आपल्या कुटुंबासह पुण्याहून नगरकडे येत होत्या. चारचाकी गाडीत मुलगा, आई तसेच मैत्रीण असे चाैघेजण होते. नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटाजवळ दुचाकीस्वारांनी कट मारला व जरे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची केली. त्यात आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. मानेवर वार झाल्याने रेखा जरे यांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या आईच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाले होते. त्यामधील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून दोघांना अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतरास एकास अटक करण्यात आली. तीनही आरोपींना आज पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून, तो पसार झाला आहे. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर आहेत.

फोटो ठरला आरोपीचा दुवा

दरम्यान, बाचाबाची सुरू असताना चारचाकीमधून एकाने संबंधित आरोपीचा फोटो घेतला होता. तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्यावरून पोलिसांना आरोपींना पकडणे अधिक सोपे झाले. सोमवारी घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तपास सुरू केला. घटनेच्या वेळी मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासाचा मोठा दुवा ठरला. पोलिसांनी त्यावरूनच चोवीस तासात आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. फोटोमुळे आरोपीच्या जवळ पोलिस पोहचू शकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com