आज रेकाॅर्ड ब्रेक ! नगर जिल्ह्यात आढळले 428 रुग्ण - Record break today! 428 patients found in the district | Politics Marathi News - Sarkarnama

आज रेकाॅर्ड ब्रेक ! नगर जिल्ह्यात आढळले 428 रुग्ण

मुरलीधर कराळे
बुधवार, 22 जुलै 2020

कोरोना टेस्ट लॅबमध्ये 84, अँटीजेन चाचणीमध्ये ४४, तर खासगी प्रयोगशाळेत तब्बल 300 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 2620 झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात 428 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आजचे अहवालाने यापूर्वीचे सर्व रेकाॅर्ड तोडले आहे. कोरोना टेस्ट लॅबमध्ये 84, अँटीजेन चाचणीमध्ये ४४, तर खासगी प्रयोगशाळेत तब्बल 300 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 2620 झाली आहे.

मंगळवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा १४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यामुळे २४ तासात ८४ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर तालुका २५, पारनेर तालुका १, श्रीगोंदा तालुका १५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ३, राहुरी १, अकोले २ कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे 

नगर शहरात सकाळच्या अहवालात 13 रुग्ण आढळून आले होते. स्‍टेशन रोड, सावेडी, सारडा गल्‍ली, सावेडी, केडगाव, पंचपीर चावडी, सिध्‍दार्थ नगर, नगर शहर मध्यवस्ती आदी भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे आज तब्बल 16 रुग्ण आढळून आले. ब्राम्हण गल्ली (भिंगार), नागरदेवळे, टाकळी खातगाव आदी ठिकाणीही रुग्णांची नोंद झाली. राहुरी तालुक्यातील कात्रड, श्रीरामपूर शहर, पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या, श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण, हिंगेवाडी, बेलवंडी, काष्टी, चिकलठाणवाडी, निमगाव खलू आदी ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. कर्जत तालुक्यातील निंबोडी, कोळवडी, तर अकोले शहरातही रुग्ण आढळून आले आहे.अँटीजेन चाचणीत आज ४४ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ३, नेवासा ६, कोपरगाव २, संगमनेर २१, कॅन्टोन्मेंट ४, महानगर पालिका क्षेत्रात ३ आणि राहाता येथे ५ अशा रुग्णांची नोंद झाली आहे.

सायंकाळी आलेल्या खासगी प्रयोगशाळेतील अहवालात तब्बल 300 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हाभरातील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. सध्या जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1281 असून, 1291 रुग्ण बरे झालेले आहेत. आतापर्यंत 48 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सध्या ठप्प आहेत. पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, अकोले आदी तालुक्यांत संपूर्ण बंद करण्यात आले आहे. नगर शहरातही नागरिकांमधून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, रुग्णांची संख्या अद्याप कमी होत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांना कोणत्या रुग्णालयात दाखल व्हायचे, हे रुग्णांच्या मनावर असल्याने खासगी रुग्णालयांत बाधित रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख