या कारणासाठी अंधारात जंगलातून मंत्री तनपुरे यांचा मोटारसायकलवरून प्रवास - For this reason, Minister Tanpure traveled through the forest in the dark on a motorcycle | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

या कारणासाठी अंधारात जंगलातून मंत्री तनपुरे यांचा मोटारसायकलवरून प्रवास

विलास कुलकर्णी
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्ख प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला.

राहुरी : तालुक्याच्या पश्चिमेकडील दूर्गम, डोंगराळ, वन खात्याच्या जंगलातील आदिवासी पाडा बोंबलदरा!  राहुरी-संगमनेर सीमेवर, दुरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. काल (रविवारी) रात्री साडेआठ वाजता ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नवीन विद्युत रोहित्राचे उद्घाटन करून, आदिवासी बांधवांच्या अंध:कारमय जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश पोहोचविला.

चिखलठाणपासून पाच किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून, दुर्गम जंगलातील अरुंद वाटेवरून प्रवास करून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना बोंबलदरा गाठले.  त्यांच्यासमवेत महावितरणचे सहाय्यक अभियंता मुथ्थुकुमार स्वामी, विनोद काळनर, इसाक सय्यद, आबा काळनर, अशोक डोमाळे, विजय डोमाळे उपस्थित होते. आदिवासी भागातील शेतकरी झुंबर केदार, चिमाजी केदार, सखाराम केदार, मंजाबापू केदार, भाऊ केदार, बाळू केदार यांनी स्वागत केले.

बोंबलदरा येथे पिढ्यानपिढ्या आदिवासी शेतकरी वनखात्याच्या जमिनी कसून, उदरनिर्वाह करतात. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करून कसत असलेल्या वनखात्याच्या जमिनी एक महिन्यापूर्वी आदिवासींच्या नावावर करून दिल्या. तेथे महिनाभरात वीज पोहोचवून पिढ्यानपिढ्या अंधारात चाचपडत असलेल्या आदिवासी लोकांचे जीवन प्रकाशमय केले.

महाराष्ट्राभर विविध कार्यक्रमासाठी फिरत असताना मंत्री तनपुरे यांना हा अनुभव वेगळाच ठरला.

आदिवासी लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश

 "मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्ख प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला, असे मत ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख