या कारणाने तिन कोरोना रुग्णांवर पाथर्डीत गुन्हा - For this reason, the crime in Pathardi on the three corona victims | Politics Marathi News - Sarkarnama

या कारणाने तिन कोरोना रुग्णांवर पाथर्डीत गुन्हा

मुरलीधर कराळे
रविवार, 12 जुलै 2020

दोन महिला व एक पुरुष कात्रजहून पाथर्डी तालुक्यात आले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी पाथर्डीचे जिल्हा रुग्णालय गाठले. कोरोनाची लक्षणे असूनही त्यांनी स्थानिक ठिकाणी कळविले नाही.

नगर : कोरोना झाल्याचे माहिती असतानाही तिघांनी कात्रज (पुणे) येथून विनापरवाना पाथर्डीपर्य़ंत प्रवास केला. आपत्ती व्यवस्थापन व कोविडबाबतचे नियम पाळले नसल्याच्या कारणाने पाथर्डीत तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. 

पाथर्डी पोलिस ठाण्यात याबाबत पोलिस कर्मचारी अच्युत चव्हाण यांनी तक्रार दिली. दोन महिला व एक पुरुष कात्रजहून पाथर्डी तालुक्यात आले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी पाथर्डीचे जिल्हा रुग्णालय गाठले. कोरोनाची लक्षणे असूनही त्यांनी स्थानिक ठिकाणी कळविले नाही. तसेच पास घेतला नसताना जिल्ह्यात प्रवेश केला आदी कारणांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. हे रुग्ण सध्या पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

नगरमध्ये चितळे रस्ता हाॅट स्पाॅट

नगर शहरातील चितळेरोड, लक्ष्मी कारंजा हा परिसर आज हाॅट स्पाॅट करण्यात आला. लक्ष्मी कारंजाजवळील एका गल्लीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण होणार आहे. चितळे रस्ता, मीरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, जिल्हा वाचनालय हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. 25 जुलैला दुपारी दोन वाजेपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन राहील. तसेच पापय्या गल्ली, रंगार गल्ली, पटवर्धन चौक, धनगर गल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवी पेठ, नेता सुभाष चौक, जगदीश भुवन मिठाईवाले हॉटेल पाठीमागील परिसर, कुंभार गल्ली, छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्केट ते पटवर्धन चौक हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सध्या हे आहेत कंटेन्मेंट झोन

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत, तेथे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या तोफखाना, सिद्धार्थनगर, पद्मानगर, बागरोजा, आयटीआय कॉलेजसमोरील नंदनवन कॉलनी व आता नव्याने चितळेरस्ता, लक्ष्मी कारंजा हा परिसर कंटेन्मेंट झोन झाले आहेत. 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख