या कारणाने भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या पोलिस ठाण्यात तक्रारी

देवेंद्रफडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर असलेल्या एकापोस्टमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यापूर्वी नाशिक, मुंबई येथील पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या आहेत.संगमनेर, नगरमध्येही पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या.
devandra
devandra

नगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावरून बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याच्या कारणावरून राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याचे काम सुरू झाले आहे. यापूर्वी नाशिक, मुंबई आदी ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. काल नगर जिल्ह्यातही अशा तक्रारी देण्यात आल्या आहेत.

संगमनेरमध्ये तक्रारी दाखल

कोरोनाच्या लढाईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्त्यावर कमी, राजभवनातच जास्त असतात अशी टिपण्णी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. यावर अकोट (अकोला) विधानसभा मतदार संघातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे याने एका राजकीय फेसबूक पेजवर आपत्तीजनक टीपण्णी केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपाच्यावतीने राज्यभरातील पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत, अशी माहिती भाजपचे संगमनेर शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी दिली.

दिलीप बोचे यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह, अपमानास्पद व बदनामी करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केली आहे. तसेच अनेक फेसबुक वापरकर्त्यांकडून संगणक, मोबाईल आदी साधनांद्वारे अत्यंत खालच्या पातळीवर जावून शब्दप्रयोग, जीवितास धोका निर्माण होईल, अशी टीपण्णी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. या प्रकरणी दिलीप बोचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

भाजप कार्यकर्ते आक्रमक

फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर असलेल्या या पोस्टमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यापूर्वी नाशिक, मुंबई येथील पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या आहेत. काल संगमनेर, नगरमध्येही पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. संबंधितांविरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा तक्रारी दाखल होत राहतील, असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com