बिहारच्या निवडणूक प्रचारात रमले नगरचे काॅंग्रेस नेते ! `त्या` मिठाईच्या पडले प्रेमात

राजगिर (जि. नालंदा, बिहार) येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवाररविज्योती कुमार यांचा सध्या ते प्रचार करीत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी नुकत्याच एकापत्रकार परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
deshmukh.png
deshmukh.png

नगर : बिहारला सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात नगरचे काॅंग्रेसनेते अखिल भारतीय काॅंगेस कमिटीचे निरीक्षक विनायकराव देशमुख चांगलेच रमले आहेत. एव्हढेच नाही, तर तेथील संस्कृतीचा अभ्यास करताना ते बिहारच्या ताज्या मिठाईच्या प्रेमात पडले आहेत.

राजगिर (जि. नालंदा, बिहार) येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविज्योती कुमार यांचा सध्या ते प्रचार करीत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तेथील सभांमध्ये भाषणे करून त्यांनी मतदारांची मने जिंकली आहेत.

तेथे मुक्कामी असताना त्यांनी एक अनुभव विषद केला आहे. देशमुख म्हणतात, राजगिर हे बिहारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. नालंदा विद्यापीठ, वीरायतन, जैन मंदिर, जरासंध का आखाडा, जपानी मंदिर, स्वर्ण भांडार, वेनुवण, पंडुपोखर,गरम पाण्याचे चार कुंड, बिंबीसार जेल, अजातशत्रू किल्ला, पिप्पला लेणी, मणियार मठ ही येथील ठळक वैशिष्ट्ये आहेत. कोरोनामुळे यापैकी अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी सध्या खुली नाहीत.

या स्थळांच्या जवळच एका हाॅटेलमध्ये माझी निवासाची व्यवस्था आहे. पर्यटनस्थळ असल्यामुळे जैन, मारवाडी पद्धतीच्या जेवणाची दर्जेदार व्यवस्था आहे. त्यामुळे माझ्या आवडीचे जेवण मला मिळते. जवळपास आठ दिवसांपासून इथेच असल्यामुळे माझी आता या बहुतांश मंडळींशी चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे काही निवांतक्षणी वेळ मिळेल तसा मी त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यांची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

अशापैकीच एक म्हणजे  'हर हर महादेव मिष्टांन्न भांडार' इथला फक्कड चहा प्यायला लोक लांबून येतात. दररोजची ताजी मिठाई हे इथले वैशिष्ट्य. सकाळी बनविलेली मिठाई संध्याकाळपर्यंत संपलेली असते. पेढे, गुलाबजाम, मलाईबर्फी, खाजा, चुरमा, जिलेबी यासोबतच गरमागरम मसाला दूध, असा दररोज बदलता मेनू असतो. सकाळी मी चहाला त्याच्याकडेच जातो. त्याचवेळी विचारुन ठेवतो, "आज क्या बना रहे हो " , मग त्याच्या उत्तरानुसार माझे  'मिठाईग्रहणाचे नियोजन' निश्चित होते. एवढं वर्णण केल्यावर तुम्हाला वाटेल "भारीच दुकान दिसतय." पण ते भारी वगैरे काही नाही, अगदी साधं टपरीछाप दुकान आहे. पण रोजची विक्री किमान पन्नास हजार रुपये तरी असेल. मात्र दुकानाच्या मालकाच्या कष्टाला तोड नाही. सकाळी सातपासून रात्री ९.३० पर्यंत पठ्ठ्या दुकानातच असतो.

दुध आटवणे, खवा तयार करणे, पेढे बांधणे, गुलाबजाम बनविणे. ही सगळी कामे स्वतः करतो. हाताखाली दोन तीन मदतणीस आहेत. मात्र या माणसाचे कष्ट पाहिल्यावर वाटते, आपण तर काहीच कष्ट करत नाही. आज या माणसाला म्हटलं  "तुमचा एक फोटो घेऊ का ? " त्याने आनंदाने संमती दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com