राळेगणसिद्धीची निवडणूक होणार ! आमदार नीलेश लंकेंची पहिली घोषणा हवेत विरली - Ralegan Siddhi election to be held! MLA Nilesh Lanka's announcement was in the air | Politics Marathi News - Sarkarnama

राळेगणसिद्धीची निवडणूक होणार ! आमदार नीलेश लंकेंची पहिली घोषणा हवेत विरली

मुरलीधर कराळे
सोमवार, 4 जानेवारी 2021

आमदार नीलेश लंके यांनी सर्वात आधी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होते, परंतु ही घोषणा हवेतच विरली.

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही. तेथे दोन जागा बिनविरोध झाल्या असून, इतर जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमदार नीलेश लंके यांनी सर्वात आधी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होते, परंतु ही घोषणा हवेतच विरली.

ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी हजारे यांनी अनेकदा प्रयत्न करून महाराष्ट्रातील अनेक गावे बिनविरोध झाले आहेत. राळेगणसिद्धी येथे यापूर्वीही अनेक वर्ष ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. मागील वर्षीही निवडणूक झाली होती. या वर्षी नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध होऊ शकल्या. तेथे अनिल नामदेव मापारी व स्नेहल महेश फटांगरे यांच्या विरोधात एकही अर्ज शिल्लक राहिला नसल्याने ते बिनविरोध निवडून येणार आहेत. इतर सात जागांसाठी मात्र निवडणूक होणार आहे. 

दरम्यान, पारनेर तालु्क्यात ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी प्रयत्न केले. बिनविरोध निवड होणाऱ्या गावांना बक्षिसे जाहीर केले. राळेगणसिद्धी येथील इच्छुकांची बैठक घेऊन दोन गटांत जागा वाटपही करून दिल्या. ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचेही जाहीर करून टाकले. असे असताना मात्र नंतर इच्छुकांनी अर्ज दाखल केले. आज अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले जाऊन ही ग्रा्मपंचायत बिनविरोध होईल, अशी शक्यता होती, मात्र ही उमेदवारांनी ऐकले नाही, आणि ग्रामपंचायतीला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख