राजेंद्र नागवडे झाले भाजपमध्ये पुन्हा `ॲक्टिव`

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असणारे नागवडे काल मंगळवारी दिवसभर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत तालुका दौऱ्यात दिसले.
rajendra nagawade.jpg
rajendra nagawade.jpg

श्रीगोंदे : विधानसभा निवडणुकीला काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी मेहनत घेतलेले नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासाठी ॲक्टिव्ह झाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असणारे नागवडे काल मंगळवारी दिवसभर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत तालुका दौऱ्यात दिसले.

श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंब काँग्रेस व थोरात हे समीकरण अनेक वर्ष नगर जिल्ह्याने अनुभवले आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेस आणि थोरात कुटुंब यांच्याशी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवून श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले. त्यांच्या निधनानंतर श्रीगोंद्यातील काँग्रेसची सूत्रे त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांच्याकडे आली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी महिला प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर महिला संघटन संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले त्या सध्या काँग्रेसच्या माध्यमातूनच जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे प्रामाणिक राहत त्या काँग्रेसमध्येच असल्याचे अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले.

दरम्यान, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर काही काळ द्विधा मनस्थितीत राहिलेले राजेंद्र नागवडे सुरुवातीच्या काळात मंत्री थोरात यांच्याशी ही संबंध वाढविले होते. त्यामुळे नागवडे पुन्हा काँग्रेस मध्ये दिसतील, अशी शक्यता दिसत होती. त्यातच राज्यात सत्तापालट झाल्यावर नागवडे भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. अगदी दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य सरकारच्या आंदोलनात त्यांनी घरी बसूनही सहभाग घेतला नाही. मध्यंतरी डॉ. विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली. राजेंद्र नागवडे तालुक्यात असूनही तिकडे फिरकले नाहीत, तर बैठकीला मुलाला पाठवले होते. या सगळ्या परिस्थितीत त्यांचा राजकीय यु-टर्न मानला जात होता. 

मात्र काल खासदार डॉ. विखेपाटील तालुका दौऱ्यावर आले, त्यावेळी राजेंद्र नागवडे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार बबनराव पाचपुते यांच्या समवेत दौऱ्यात प्रत्येक गावात पाहायला मिळाले. त्यांच्या वांगदरी या गावातही त्यांनी खासदारांचे तोंड भरून कौतुक केले आणि चहापाण्यासाठी घरीही नेले. त्यामुळे राजेंद्र नागवडे हे पुन्हा एकदा भाजपाचे संघटन वाढवण्यासाठी ॲक्टिव झाल्याचे दिसत असून, मंत्री थोरात व त्यांचे राजकीय संबध राहिले नसल्याचे त्यांनी दाखविले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com