नगर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोकण अतिरिक्त विभागीय आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. तसा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या पद भरण्यात आले आहे..
जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची आॅगस्टमध्ये बदली झाली. त्यानंतर अतिरििक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर या पदावर कोण येणार, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. क्षीरसागर यांना नगर जिल्हा चांगला माहित आहे. त्यांनी यापूर्वी पुनर्वसन अधिकारी म्हणून जिल्ह्यात काम केले आहे. तसेच संगमनेरला प्रांताधिकारी म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला आहे. या अनुभवाचा फायदा त्यांना जिल्हा परिषदेचे कामकाज पाहताना होणार आहे.

