शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जगताप यांचा असाही संकल्प - Rahul Jagtap's resolution on the occasion of Sharad Pawar's birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जगताप यांचा असाही संकल्प

संजय आ. काटे
शनिवार, 12 डिसेंबर 2020

श्रीगोंदे मतदारसंघात शेतकरीहिताचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. आता त्यात तरुणांचाही सहभाग घेणार असून, शेतकऱ्यांच्या समस्यांभोवती तरुणाईच्या आधाराचे कवच उभे करण्याचा प्रयत्न आहे.

श्रीगोंदे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेला संघर्ष 80 व्या वर्षीही सुरू आहे. पवार यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांनी देशातील शेतकरी टिकला. त्यांच्या याच संघर्षात आता तरुणांची मोठी फळी उभी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तरुणांची आक्रमकता, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, असा दुहेरी फायदा या लढ्यात घेताना पवार यांच्या स्वप्नातील शेतकरी उभा करण्याचा संकल्प सोडल्याची माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, "श्रीगोंदे मतदारसंघात शेतकरीहिताचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. आता त्यात तरुणांचाही सहभाग घेणार असून, शेतकऱ्यांच्या समस्यांभोवती तरुणाईच्या आधाराचे कवच उभे करण्याचा प्रयत्न आहे. सरकारदरबारी जे प्रश्न सुटणार आहेत, त्यांचा यात समावेश न करता, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करताना या तरुणांचा उपयोग करून घेऊ.''

मी प्रामाणिक काम केले तरीही टीका

"आमदार असताना मी प्रामाणिक काम केले. मात्र, तरी माझ्यावर टीका झाली. ती करणारे आता कोठे आहेत,'' असा सवाल करीत जगताप म्हणाले, "राज्यात भाजप सरकार असताना माझ्याकडे आमदारकी आली. त्या वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कामे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले; पण आता आम्ही सरकारच्या माध्यमातून येथे कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कुकडी, घोड व सीना धरणांतील पाण्याचे न्याय्य वाटप करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, रखडलेली साकळाई योजना मार्गस्थ व्हावी, यासाठीही राबत आहोत. माणिकडोह ते डिंभे धरणांदरम्यान बोगद्याचे काम लवकरच मार्गी लागेल.''

शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे

जगताप म्हणाले, ""पवार यांचा 80वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा कार्यक्रम करता येणार नसला, तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प सोडणार आहोत. ज्यांनी उभे आयुष्य शेतकरी व सामान्यांचे संसार उभे करण्यात खर्च केले, त्यांना देशाचे नेतृत्व करताना पाहण्याचे स्वप्न अजूनही आम्हीच काय, राज्यातील सगळेच बाळगून आहेत.''
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख