श्रीगोंदेतील बंधाऱ्यासाठी राहुल जगताप यांचा पाठपुरावा, मंत्री गडाखांकडून मंजूर केले बारा कोटी

लवकरच प्रत्यक्षात या बंधाऱ्यांची कामे सुरू होतील. या बंधाऱ्यांच्या कामांसाठी येथील स्थानिकशेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
Rahul jagtap.jpg
Rahul jagtap.jpg

श्रीगोंदे : तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी 12 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांसाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा करुन तालुक्यातील गावांसाठी बंधारे मंजूर करुन घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, की लवकरच प्रत्यक्षात या बंधाऱ्यांची कामे सुरू होतील. या बंधाऱ्यांच्या कामांसाठी येथील स्थानिक शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. 

या मंजूर बंधाऱ्यामध्ये शेडगाव येथील धोंडेवस्ती व शेडगाव बेट, टाकळी कडेवळीत नवलेवस्ती, भिंगाण लांडगे वस्ती, देवदैठण पिंपळडोह व माणिकडोह, येळपणे येथील खंडोबा मंदिर, रडतोंड डोह, बेलवंडी, शेरी, सारोळा सोमवंशी येथील संगम, बेलवंडी येथील शिकारे मळा व घोडेगाव जांभळीचा डोह, आढळगाव येथे वलीबा व भावडी येथील मुंजावस्ती, चांभुर्डी येथील भुडकी, चांडगाव येथे मळई, श्रीगोंदे पुलाच्या खाली, तांदळी दुमाला येथील भोस वस्ती यांचा समावेश आहे. 

हेही वाचा...

डॉक्‍टरांकडून लसीकरणातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न 

शिर्डी : साधी सर्दी, अंगदुखी सहन केली, की कोविडला रामराम ठोकता येतो. कोविड लसीने ही किमया केली आहे. त्यामुळे लस घ्या, सुरक्षित राहा, असा संदेश साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रितम वडगावे व राहाता ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा अधिकारी संजय उबाळे देत आहेत. त्यांना आलेला अनुभव इतरांना सांगताना, लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करीत आहेत.

राहाता येथील सर्जन डॉ. किरण गोरे यांनी लशीचे दोन डोस घेतले. आता त्यांनी वेळ मिळेल, त्या दिवशी कोविड सेंटरला भेट देऊन काही काळ रुग्णसेवा करण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे. 

डॉ. वडगावे व उबाळे यांनी कोवि-शील्ड लशीचे दोन डोस घेतले. 15 दिवसांनंतर त्यांचा कोविड चाचणी अहवाल "पॉझिटिव्ह' आला. मात्र, दोघांनाही कुठलीही लक्षणे जाणवली नाहीत. सर्दी, थोडी अंगदुखी सहन करावी लागली. सात दिवसांच्या औषधोपचारानंतर ते ठणठणीत झाले. काही काळाने पुन्हा सेवेत रूजू झाले. त्यांचे हे उदाहरण कोविड लसीकरणाच्या प्रचारासाठी उपयुक्त ठरते आहे. लसीकरणानंतर कोविडपासून सुरक्षा मिळते, हे त्यांनी दाखवून दिले. लसीकरणाबाबत अद्याप काहींच्या मनात साशंकता आहे. अशा उदाहरणांमुळे ती दूर होण्यास मदत होते. 

राहाता येथील सर्जन डॉ. किरण गोरे यांनी लशीचे दोन डोस घेतले. 15 दिवसांनंतर आता त्यांनी येथील सरकारी कोविड सेंटरला वेळ मिळेल, तशी भेट देऊन रुग्णसेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की लस घेतल्यानंतर कोविड संसर्ग झाला, तरी सौम्य लक्षणे असतात. वेगळा आत्मविश्वास येतो. इतरांना लसीकरणाचे महत्त्व पटावे, यासाठी वेळ मिळेल, तेव्हा रुग्णसेवा करणार आहोत. 

दरम्यान, राहाता तालुक्‍यात आजवर 16 हजार जणांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला असून, बऱ्याच कोविड योद्‌ध्यांना दुसरा डोस देण्याचे नियोजन झाले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रभर लसीकरण मोहीम सुरू असून, नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com