राहुल गांधी दुटप्पी ! जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा : विखे पाटील

एकीकडे सत्‍तेत राहायचे, सत्‍तेचा मलीदाचाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्‍हणुन जबाबदारी झटकायची, असे दोन्‍ही बाजुने बोलायचे, हे चालणार नाही, अशा शब्दांत विखे पाटील यांनी काॅंग्रेसला ठणकावले.
rahul gandhi
rahul gandhi

नगर : ``राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. काॅंग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा,`` असा टोला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काॅंग्रेसला लगावला.

काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत आज माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी काॅंग्रेसनेत्यांना खडे बोल सुनावले. गांधी यांनी काल माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकारविषयी भूमिका मांडली होती. त्यावर राजकीय क्षेत्रात जोरदार खल झाला होता. भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेण्याची संधी मात्र सोडली नाही. राहुल गांधी म्हटले होते, की महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. ज्या राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे, तेथे आम्ही निर्णय घेऊ शकतो. मात्र केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी.

यावर आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, ``राहुल गांधी यांचे विधान दुटप्‍पी आहे. सरकारमध्‍ये राहायचे आणि आम्‍हाला निर्णयाचे आधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे. निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील, तर मग सरकारमध्‍ये तुम्‍ही थांबलातच कशाला. तात्‍काळ सरकारमधुन बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा.``

एकीकडे सत्‍तेत राहायचे, सत्‍तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्‍हणुन जबाबदारी झटकायची, असे दोन्‍ही बाजुने बोलायचे, हे चालणार नाही, अशा शब्दांत विखे पाटील यांनी काॅंग्रेसला ठणकावले.

हेही वाचा...

कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी 

राहुरी विद्यापीठ :  ""मागील काही वर्षांपासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात क्रांती झाली. ही सुरवात आशादायक असून, भविष्यात खूप वाटचाल करायची आहे. शेती क्षेत्रात क्रांती झाली असली, तरी आर्थिक बाजूने शेतकरी अजूनही मागे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातून कमी-अधिक शिकलेला तरुण पुन्हा ग्रामीण भागात परतत असताना त्याला पीकनिहाय मूल्यसाखळीत स्थान कसे देता येईल, हे पाहिले पाहिजे. कृषी पदवीधर, तसेच कृषी उद्योजक व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतील,'' असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

"शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकास' या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. बंगळूर (कर्नाटक) येथील शेतकरी उत्पादक संघटना- आधुनिक केंद्राचे संचालक डॉ. अशोक अलूर, महाराष्ट्र राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, नाशिकच्या सह्याद्री ऍग्रोचे इंजिनिअरिंगचे विलास शिंदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रकल्पाचे डॉ. सुनील गोरंटीवार, महा एफ. पी. ओ. फेडरेशनचे प्रवर्तक डॉ. संजय पांढरे उपस्थित होते. 

डॉ. अशोक ढवण म्हणाले, की जागतिक पातळीवर शेती उत्पादनांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे काही प्रमाणात धोकेसुद्धा आहेत. या सर्वांचे विश्‍लेषण होणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या दृष्टीने विभागनिहाय प्रशिक्षणे आयोजित केली तर त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रशिक्षणांचा फायदा होईल. 

डॉ. विश्वनाथा म्हणाले, की देशात लहान व मध्यम गटातील शेतकरी 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहेत. दोन वर्षांपूर्वी शासनाने गटशेतीसाठी मोठी तरतूद केली होती. याचा फायदा या गटातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात सह्याद्री ऍग्रोसारख्या कंपन्या स्थापन झाल्या पाहिजेत. उत्पादनांची ओळख जोपर्यंत ब्रॅंड म्हणून होत नाही, तोपर्यंत शेतीमध्ये शाश्वतता येणार नाही. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून 200पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com