राहुल द्विवेदी यांची बदली, आर. बी. भोसले नवे जिल्हाधिकारी - Rahul Dwivedi's replacement, R. B. Bhosale new Collector | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राहुल द्विवेदी यांची बदली, आर. बी. भोसले नवे जिल्हाधिकारी

मुरलीधर कराळे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून, आर. बी. भोसले आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. राज्यातील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या.

नगर : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून, आर. बी. भोसले आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. राज्यातील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या.

नगरला द्विवेदी तीन वर्षांपूर्वी आले होेते. त्यांच्या काळात प्रशानावर वचक बसू शकला नाही. पारनेर तालुक्यात तहसीलदारांवर हल्ले होण्याचे प्रकार अनेकदा घडले. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे जिल्हा संकटात होता. पुन्हा लाॅकडाऊनची मागणी समाजामधून होत असताना लाॅकडाऊनचा निर्णय न घेतल्याने राजकीय नेत्यांचा त्यांच्यावर रोष होता. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर उघडपणे आरोप केले होते. समाजात कोरोना जास्त प्रमाणात फैलावण्यास तेच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले होते. द्विवेदी यांनी जनतेशी जास्त संपर्क ठेवला नाही. त्यामुळे नागरिकांमधूनही नाराजी होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख